23 November 2024 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

VIDEO | मुस्लिम नव्हे तर सर्वाधिक गद्दार हिंदूंमध्ये आहेत | त्यांचं बोट शिंदेंकडे अन शिंदेंचा हात चिमुकल्याच्या डोक्यावर

VIDEO Eknath Shinde

Eknath Shinde | राज्यात राजकीय संकट ओढावलं आहे. शिवसेनेचे अनेक आमदार बंड करून एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे गेल्याने महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात आहे. अशात आता उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.

जिद्द सोडली नाही – उद्धव ठाकरे :
उद्धव ठाकरे म्हणाले, कोण कोण कोणत्यावेळी आपल्याशी कसं वागलं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्यादिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी या पदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

बंडामागे भाजप :
या बंडामागे भाजप असल्याची व्यंगचित्रे, मीम्स, सोशल मीडियावरील तर्कविर्तक लावणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट या सगळ्यांतून एकच सूर उमटताना दिसतोय, तो म्हणजे या सगळ्यांमागे भाजपचं आहे. भाजपच्या नेत्यांचं मौनामुळे या चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते थेटपणे यावर काही बोलताना दिसत नाही. विशेषतः भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या असून, त्यांनी माध्यमांना दूरच ठेवलं आहे.

गद्दारी आणि तो व्हिडिओ चर्चेत :
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे आणि त्यावर नेटिझन्सनी एकनाथ शिंदेंना यांना जोरदारपणे पक्ष केल्याचं पाहायला येतंय. यामध्ये एका मठात समोर गुरु संवाद साधताना दिसत आहेत. हिंदुत्वासंदर्भात संवाद साधताना त्यांनी इतर धर्मियांचा संदर्भ दिला आणि सर्वाधिक गद्दार हे हिंदूंमध्ये असतात असं म्हटलं आहे. मात्र हे सांगताना संवाद साधणाऱ्या गुरुचं बोट योगायोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे स्थिरावतं आणि सत्य योगायोग म्हणजे यावेळी एकनाथ शिंदे यांचा उजवा हात बाजूला उभा असलेल्या एका चिमुकल्याचा डोक्यावर दिसतोय. त्यामुळे समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे नेमका व्हिडीओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO Eknath Shinde in presence of Aaditya Thackeray check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x