23 November 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

बंडखोरांचं खरं नाही | राज्यभर शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार | राष्ट्रवादीची मोठी सोबत मिळणार

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसैनिकांना एखाद्या दैवताप्रमाणे असलेल्या मातोश्रीविरोधातच शिवसेनेचे निष्ठावंत म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा उधळलेला गुलाल खाली बसत नाही, तोच शिवसेनेला भगदाड पडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन आधी गुजरातमधील सुरत गाठलं. आता आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत मुक्काम ठोकलाय.

भाजप विरोधातही प्रचंड रोष :
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाने केलेल्या बंडाळीने राजकीय वर्तुळात हादरा बसला. अचानक झालेल्या राजकीय भूकंपामागे कोण, असे प्रश्न निर्माण होत असतानाच सुरतच्या हॉटेलमध्ये भाजपचे दोन नेते शिवसेनेतील बंडखोर आमदारांसोबत दिसले. त्यानंतर गुवाहाटीत पोहोचलेल्या आमदारांच्या स्वागतासाठीही भाजपचे आमदार आले. ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार मुक्कामी थांबणार होते, त्या हॉटेलला आसामचे मुख्यमंत्री हिमंत हिमंत बिस्वा शर्मा यांनी सकाळीच भेट दिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भाजप विरोधातही प्रचंड रोष शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतो आहे. परिस्थिती चिघळ्यास भाजपची कार्यालयं सुद्धा लक्ष केली जाऊ शकतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना हायअलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसही हाय-अलर्ट :
मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट करण्यात आले आहे. शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरतच्या विमानतळावर भाजपचे नेते मोहित कंबोज तर माध्यमांना गुंगारा देऊन पळतानाचं कैद झालं… एकापाठोपाठ एक समोर आलेल्या माहितीने या सगळ्यांमागे भाजप असल्याचं सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे परराज्यातून पाहिलेल्या घडामोडी आणि गुजरात पोलिसांचा थेट यामध्ये सहभाग कॅमेऱ्यात कैद झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये सुद्धा या बंडखोर आमदारांबद्दल चीड निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे मतदार नसलेयांना सुद्धा हा सर्व प्रकार पटलेला नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यास पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel against Shivsena high alert in state check details 24 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x