22 November 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Multibagger Stock | तुम्हाला 121 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा हवा आहे? | हा शेअर देईल मजबूत पैसा

Multibagger Stocks

Multibagger Stock | वेदांताच्या शेअरमध्ये आज ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. कंपनीचे समभाग सुमारे 3% वाढून 227.85 रुपयांवर बंद झाले. अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या कंपनीबाबत इनव्हेस्टमेन्ट बँक आणि प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने तेजीचा अंदाज वर्तविला. ब्रोकरेजने 490 रुपये टार्गेट प्राईस दिली, जी आधीच्या 221.40 रुपयांच्या बंदच्या तुलनेत 121 टक्क्यांनी जास्त आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेजने काय म्हटले :
वेदांतचा शेअर ५ दिवस, २० दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवसांच्या फिरत्या सरासरीपेक्षा कमी ट्रेड करीत आहे. एका वर्षात हा शेअर १३ टक्के तर २०२२ मध्ये ३२ टक्क्यांनी घसरला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेजने म्हटले की, स्टॉक अनेक दशकांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे आणि वेदांता उच्च एलएमई झिंकच्या किंमतींवर गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत मॅनिंग कंपनीने ५,७९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ६,४३२ कोटी रुपयांच्या तुलनेत ९.८४ टक्क्यांनी कमी आहे. ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ३९,३४२ रुपयांवर पोहोचला आहे, जो वर्षभरापूर्वीच्या तिमाहीतील २७,८७४ कोटी रुपयांवरून ४१.१४ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या बोर्डाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर ३१.५ रुपये म्हणजे ११,७१० कोटी रुपये इतका पहिला अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks of Vedanta Share Price may give return up to 121 percent says J P Morgan check details 27 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x