23 November 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

नाव ने घेता राज ठाकरेंची प्रथमच टीका | त्यावर अनेक मराठी नेटिझन्सचे प्रतिप्रश्न | तर अमराठी घेत आहेत मजा

Raj Thackeray

Raj Thackeray | उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.

राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मशिदीवरील अजानच्या भोंग्यावरून मनसेनं राज्यात मोठं आंदोलन सुरू केले होते. त्याचबरोबर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावरही राज यांनी सरकारवर टीका केली होती. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही मनसेच्या आमदारानं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मतदान केले होते.

दरम्यान, त्यांनी थेट नाव न घेता ३ भाषेत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!. हिंदीमधूनही राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray tweet after Eknath Shinde rebel check details 30 June 2022.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x