21 November 2024 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

केंद्राला फडणवीसांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं | प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील लोकांबरोबरच राजकीय मंडळींनाही हा धक्का होता. देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतील लोकांनी गेम केला अशी चर्चा कालपासून राज्यामध्ये आहे. यासंपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे :
बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेच्या बाजूने गेलं तर :
पुढे आंबेडकर म्हणाले की 11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेच्या बाजूने गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत, सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्या ही पक्षात व्हीपची नेमणूक पक्षाच्या अध्यक्ष करत असतो आणि सेनेची वर्किंग कमिटी याच मार्गावर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मूळ शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे :
शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावा लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा स्वत:चा कायद्याचा अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी पुढील प्रकिया सांगितली आहे. याच मुद्द्यावर ते म्हणाले ११ जुलै रोजी विश्वास धारक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला असला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्या वेळी वाटतं की या सरकारकडे बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला :
देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले असं ट्विट मी केलं आहे. फडणवीसांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का? हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते ना? असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Prakash Ambedkar reaction on appointing Devendra Fadnavis as a DCM of Maharashtra check details 01 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x