25 November 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

शिवसेनेत माझ्यावर अन्याय, मनसेने आवाहन केलं होतं, पण निर्णय योग्य वेळी : केदार दिघे

ठाणे : सध्या रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर केदार दिघेंकडे प्रसार माध्यमांचे कॅमेरे फिरले आहेत. केदार दिघे यांचं वय सध्या ३८ वर्ष असून आनंद दिघेंचे पुतणे या नात्याने त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. सध्या ते ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेमार्फत ठाणेकरांशी जोडले गेले आहेत.

यादरम्यान आनंद दिघेंच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांसदर्भात जेव्हा त्यांच्यासोबत माध्यमांनी सविस्तर चर्चा केली, त्यामुळे अनेक विषयांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, निलेश राणेंच्या आरोपांवर बोलताना त्यांनी पुरावे असतील तर द्यावेत असे भाष्य केले होते. पण जर निलेश राणेंकडे काही पुरावे नसतील तर निवडणूक जवळ असल्यामुळे फक्त आरोप करू नये, असं प्रतिउत्तर दिलं होतं.

मात्र आनंद दिघेंच्या मृत्यू विषयी बोलताना ते म्हणाले की, ‘ज्या दिवशी साहेबांचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि मी काही वेळ फ्रेश होण्यासाठी दुपारी इस्पितळातून घरी आलो. मी रात्री पुन्हा इस्पितळात जाणार होतो, परंतु संध्याकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यानंतर ही बातमी सर्वत्र आग लागल्यासारखी पसरली. काय झालं, काय नाही झालं हे सांगण्यासाठी त्यावेळी मी इस्पितळात नव्हतो. परंतु, त्याच्यानंतर आजतागायत निलेश राणे म्हणतात तशी कोणती गोष्ट असेल, तर त्यांनी ती आधी पुराव्यानिशी सिद्ध करावी. मी वयाच्या १९व्या वर्षी आनंद दिघे साहेबांना अग्नी दिला आहे. आनंद दिघे साहेबांना जो अग्नी मी दिला आहे, त्याची आग आज सुद्धा माझ्या हृदयात आहे. माझ्या वडिलांना अग्नी दिल्यासारखा, पुत्राप्रमाणे मी त्यांना तेव्हा अग्नी दिला आहे.

मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणाबद्दल बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मी राजकारणात होतो. परंतु, २००६ ला मी शिवसेनेत प्रवेश केला. तसंच त्यानंतर मी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सुरू केलं. त्याद्वारे मी समाजकार्याला आणि सामान्यांशी जोडलो गेलो. दरम्यान, २०१३ मध्ये मला युवा सेनेचं निरीक्षक पद बहाल करण्यात आलं. पण तब्बल ६ वर्षं सातत्यानं शिवसेनेचं काम करुन सुद्धा शिवसेनेनं मला शहर निरीक्षक पद दिलं नाही, तर ग्रामीण देण्यात आलं. तिथे मी युवा सेनेची सगळी घडी व्यवस्थित बसवली. आज माझं वय ३८ वर्ष आहे, त्यामुळे केवळ युवासेनेच्या पदावर कार्यरत राहणं आता चुकीचं आहे, असं मला वाटतं.

परंतु, पक्षाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मी २०१७ साली त्या पदाचा राजीनामा दिला. पण नोव्हेंबर २०१७ ते आजपर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेनं अथवा स्थानिक नेत्यांनी दिली नाही. त्यामुळे आज मी त्यांच्यासाठी केवळ एक कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत आहे. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी कधीच वावरलो नाही आणि त्यामुळे मला नेहमीच अन्यायाची भावना दिसून येते.

मागील तब्बल १८ वर्षांत शिवसेनेकडे आमदारकी, खासदारीसुद्धा मागितली नाही. २०१९ साठी मी शिवसेनेकडे ठाणे शहर या विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मागतोय. कारण गेल्या वेळी इथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला आहे. त्यामुळे मला उमेदवारी मागण्यात काहीच वावगं वाटत नाही. परंतु, खेदाची गोष्ट हीच आहे की शिवसेनेकडून मला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, केदार दिघे तुम्ही आमच्याकडे या, असं आव्हान मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला केलं होतं. परंतु, मी तेव्हा कोणताही निर्णय घेतला नाही. परंतु, योग्य वेळेला योग्य तो निर्णय मी घेईल. पण २०१९ मी नक्की लढवणार, कुणी उमेदवारी देवो अथवा न देवो. अशी सविस्तर उत्तर त्यांनी बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x