22 November 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Nexon EV Prime | टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम स्मार्ट फीचर्ससह लाँच | नव्या व्हर्जनमध्ये खास काय पहा

Tata Nexon EV Prime

Tata Nexon EV Prime | कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल नेक्सॉन ईव्ही प्राइमचे नवीन इलेक्ट्रिक व्हर्जन सादर केले आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या मानक आवृत्तीचे हे अपडेटेड आहे. याला कंपनीने १४.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, नेक्सॉन ईव्ही प्राइमचे हे मॉडेल जुन्या व्हर्जनची जागा घेईल. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, नेक्सॉन ईव्ही प्राइम एकदा चार्ज केल्यावर ३१२ किमी अंतर पार करू शकते. कंपनी आपल्या बॅटरी आणि मोटरवर आठ वर्षे किंवा १.६० लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.

नेक्सॉन ईवी प्राइम: एक्स-शोरूम प्राइस :
नेक्सॉन ईव्ही प्राईम पाच व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे, ज्याची किंमत 14.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. येथे आम्ही याच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या किंमतींविषयी माहिती दिली आहे.

* XM – 14.99 लाख रुपये
* XZ+ – 16.30 लाख रुपये
* XZ+ Lux – 17.30 लाख रुपये
* XZ+ Dark – 16.49 लाख रुपये
* XZ+ Lux Dark – 17.50 लाख रुपये

नेक्सॉन ईवी प्राईम – Nexon EV Prime फीचर्स :
नेक्सॉन ईव्हीमध्ये रेगन मोड्स, क्रूझ कंट्रोल, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि अप्रत्यक्ष टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखे काही उत्तम फीचर्स आहेत. याशिवाय, सॉफ्टवेअर अपडेट्सच्या माध्यमातून सध्याच्या नेक्सॉन ईव्ही मालकांनाही ही नवी फीचर्स दिली जाणार आहेत. हे अपडेट २५ जुलैपासून ब्रँडच्या सर्व्हिस सेंटर्सवर उपलब्ध होणार आहे. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, नेक्सॉन ईव्ही प्राइम एकदा चार्ज केल्यावर ३१२ किमी अंतर पार करू शकते. कंपनी आपल्या बॅटरी आणि मोटरवर आठ वर्षे किंवा १.६० लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे. कंपनीने म्हटले आहे की, सध्याच्या नेक्सॉन ईव्हीच्या 22,000 खरेदीदारांना मोफत सॉफ्टवेअर अपडेट्स देऊन त्यांना नवीन मॉडेलच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज करण्याची सुविधा देखील दिली जाईल. अधिकृत सेवा केंद्रात २५ जुलैपासून सॉफ्टवेअर अपडेट करता येईल.

नेक्सॉन ईव्ही प्राइम – Nexon EV Prime’ ची वैशिष्ट्ये :
टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम कारमध्ये 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, ज्यामध्ये 127 बीएचपी आणि 245 एनएम टॉर्क जनरेट केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. यात ड्राइव्ह आणि स्पोर्टसह दोन ड्राइव्ह मोड देखील आहेत. नेक्सॉन ईव्ही सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि डेटोना ग्रे या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हे पाच व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहे, ज्याची किंमत 14.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

कंपनीने निवेदनात काय म्हटले :
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मार्केटिंग, सेल्स अँड सर्व्हिस स्ट्रॅटेजीचे प्रमुख विवेक श्रीवत्सा म्हणाले, ‘नेक्सॉन ईव्ही बाजारात आल्यानं इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. ज्यांना ईव्ही घ्यायची आहे, त्यांच्यात ही एक नैसर्गिक निवड बनली आहे,”असे सांगून ते म्हणाले की, नवीन नेक्सॉन ईव्ही प्राइम मॉडेलच्या आगमनामुळे कंपनीला ईव्ही बाजारात आपली उपस्थिती वाढण्याची आशा आहे. आधीच ६५ टक्के कंपनी ईव्ही मार्केट व्यापते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Nexon EV Prime launched check price details here 13 July 2022.

हॅशटॅग्स

#Tata Nexon EV Prime(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x