ITR Filing | ITR भरण्याची डेडलाइन चुकली तर तुम्हाला किती दंड भरावा लागेल?, दंडाचा हा आकडा वाढू शकतो
ITR Filing | आर्थिक वर्ष २०२१-२२ किंवा कर निर्धारण वर्ष २०२२-२३ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची देय तारीख वेगाने जवळ येत आहे. पगारदार आणि इतर कमावत्या व्यक्तींना वेळेवर आयटीआर भरण्याचा सल्ला दिला जात आहे, अन्यथा त्यांना ५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. करदात्याने ३१ जुलै २०२२ च्या निर्धारित तारखेपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास त्यांना विलंब शुल्काच्या स्वरूपात दंड ठोठावला जाईल.
देय तारखेनंतर आयटीआर दाखल करण्यासाठी विलंब शुल्क :
३१ जुलै २०२२ या देय तारखेपर्यंत करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआर भरण्यात अपयशी ठरल्यास काय करावे? ३१ जुलै २०२२ या ठरलेल्या तारखेपर्यंत जर करदात्याने आपला आयटीआर फाइल न केल्यास त्यास्थितीत शुल्क उशिरा भरल्यानंतर करदाता आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. करदात्याचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर विलंब शुल्क एक हजार रुपये होईल. मात्र करदात्याचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर विलंब शुल्क पाच हजार रुपये इतके असेल.
तर वेळेवर ITR दाखल करा :
करदात्यांना देय तारखेपूर्वी प्राप्तिकर भरण्याचा सल्ला देताना सेबीचे नोंदणीकृत तज्ज्ञ म्हणतात की, जर करदात्याने ३१ जुलै २०२२ पूर्वी आयटीआर भरला तर त्यात काही त्रुटी आढळल्यास तो आपल्या आयटीआरमध्ये बदल करू शकेल. मात्र, ठरलेल्या तारखेनंतर आयआर भरल्यास करदात्याला त्याचे प्राप्तिकर विवरणपत्र संपादित करणे किंवा त्यात सुधारणा करणे शक्य होणार नाही.
अन्यथा विलंब शुल्क सुद्धा वाढणार :
टॅक्स तज्ज्ञांच्या मते, करदात्याने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत एवाय २०२२-२३ किंवा आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आयटीआर दाखल न केल्यास ५,००० रुपये विलंब शुल्क 10,000 रुपये होऊ शकते. तज्ज्ञ म्हणाले की, करदात्याने ३१ जुलै २०२२ नंतर परंतु ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी आयटीआर भरला तरच ५,००० रुपये विलंब शुल्क लागू होते. ज्या करदात्याचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा करदात्याचे कमाल विलंब शुल्क १,००० रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: ITR Filing penalty after deadline check details 14 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार