22 November 2024 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सरपंच जनतेतून आणि स्वतः बंडखोर आमदारांच्या समर्थनातून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेचा सर्व वेळ गट विस्तारात, जनता अधांतरी

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकारनं रद्द केलेला सरपंच निवडीचा निर्णय पुन्हा लागू करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यापूर्वी जनतेनं निवडून दिलेले सदस्य सरपंच किंवा नगराध्यक्षांची निवड करत होते. पण, आता निर्णय बदलला जाणार आहे. हास्यास्पद म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे मात्र जनतेतून नव्हे तर चक्क बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. आजच्या घडीला लोकांना मुख्यमंत्री निवडून देण्याची संधी दिल्यास एकनाथ शिंदे शर्यतीत सुद्धा दिसणार नाहीत असं वास्तविक चित्रं आहे.

पलटी मारणारे आणि भाजपच्या स्क्रिप्टवर चालणारे मुख्यमंत्री :
आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून होणं कसं योग्य आहे हे त्यांनी पटवून दिलं होतं. पण, दोन वर्षात भाजपसोबत सरकार स्थापन होताच त्यांची भूमिका बदलेली दिसतेय. आता निर्णयाची घोषणा करताना नगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

दुसरीकडे स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री विराजमान होऊन दोघे एकटेच राज्य चालवत आहेत असं चित्र आहे. मंत्रालयातील सर्व विभाग आणि खाती मंत्र्यांविना ओसाड झाली आहे. परिणामी राज्यातील प्रशासहकीय यंत्रणा पेचात सापडून त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या प्रशासनासंबंधित कामांवर होतं आहेत. मात्र त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या गटाचा विस्तार कसा होईल याकडे जास्त लक्ष देतं आहेत. झालंच तर स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांकडून स्वतःचा प्रशासनाला आदेश देतानाच व्हिडिओ रेकॉर्ड करून तो प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवून हेडलाईन मॅनेजमेंटचे केविलवाणे प्रकार करत आहेत हे देखील दिसून येतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde maximum time for own group expansion check details 16 July 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x