22 November 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कदमांचा राजकीय विनोद? | म्हणाले भुजबळ, राणे, राज ठाकरेंनी सेना सोडल्यावर मी शिवसेना वाचवली | पण फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा

VIDEO

Ramdas Kadam | रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग लावला असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

याला कदमांच्या दावा म्हणायचा की राजकीय विनोद ?
मी शिवसेनेत ५२ वर्षे सक्रिय आहे. जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी पुढे सरसावून शिवसेना वाचवली. नारायण राणे, राज ठाकरे हे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा छातीचा कोट करून मी उभा होतो, शिवसेना फुटू नये काही चुकीचं घडू नये म्हणून मी योगदान दिलं आहे. राज्यात दंगली झाल्यानंतर पोहचणारा रामदास कदम होता. शिवसेनेसाठी मी संघर्ष केला आहे. मी सोमवारी राजीनामा दिला त्यानंतर माझी हकालपट्टी झाली. त्याचा प्रश्नच कुठे येतो? असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

फडणवीस रामदास कदमांबद्दल काय म्हणाले होते पहा :

‘बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच किरीट सोमय्यांच्या संपर्कात आलो नाही. कधीच माझा त्यांच्या संपर्क नव्हता. कदम हा पाठीत खंजीर खुपसणारा माणूस नाही. समोर येणार कदम आहे. विनायक राऊत सारख्या माणसाने माझ्याविरोधात कटकारस्थान रचले. तुम्ही आज माझ्यावर बोलताय, तुमची औकात आहे तरी का? राणे गेल्यावर कुणी केला होता संघर्ष, असा थेट आरोपच कदम यांनी केला.

आज शब्द देतो, शिवसेना कधी संपू देणार नाही. शिवसेना कशी संपेल, असं काही लोकांना वाटत आहे. पण उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा दोन पावलं मागे घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 32 किल्ले दिले होते. त्यानंतर आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर 40 किल्ले घेतले होते. त्यामुळे परिस्थितीत पाहून निर्णय घ्यावे लागेल, असं आवाहनही कदम यांनी केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO of Devendra Fadnavis over Ramdas Kadam check details 19 July 2022.

हॅशटॅग्स

#VIDEO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x