22 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Mobile Downloading Speed | मोबाइल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारताचे वर्ल्ड रँकिंग अजून खाली घसरले

Mobile Downloading Speed

Mobile Downloading Speed | स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार, मोबाइल डाउनलोडच्या मध्यम वेगाच्या बाबतीत भारताच्या जागतिक क्रमवारीत 3 स्थानांची घसरण झाली आहे. मे महिन्यात या निर्देशांकात भारताचे स्थान 115 वे होते, जे जूनमध्ये 118 व्या क्रमांकावर घसरले आहे. मे महिन्यात भारताचा सरासरी मोबाइल डाऊनलोडिंग स्पीड 14.28 एमबीपीएस होता, जो जूनमध्ये 14.00 एमबीपीएसपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचे रँकिंग सुधारले असून, ते ७५व्या स्थानावरून ७२व्या स्थानावर पोहोचले आहे.

स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स जून २०२२ :
स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स जून २०२२ नुसार जून महिन्यात एकूण जागतिक मोबाइल स्पीडच्या बाबतीत नॉर्वे अव्वल स्थानावर आहे. नॉर्वेही मे महिन्यात पहिल्या स्थानावर होता. त्याचबरोबर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत चिलीने सिंगापूरला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. ‘5 जी’च्या आगमनामुळे भारताच्या मोबाइलचा वेग जागतिक पातळीवर सुधारेल, असा विश्वासही ओकलाचे सीईओ आणि सहसंस्थापक डग सटल्स यांनी व्यक्त केला आहे.

स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स वेगाची तुलना करतो :
पॉपुआ न्यू गिनीने जून २०२२ मध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीडमध्ये सर्वात वेगवान वेगाने वाढ केली आहे आणि गॅबॉनने फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड विकसित केले आहेत. ओकलाचा स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स दर महिन्याला जगभरातील स्पीडेस्ट डेटाची तुलना करतो. इंटरनेटची कामगिरी पाहण्यासाठी वास्तविक लोकांनी दर महिन्याला केलेल्या स्पीडटेस्टमधून ग्लोबल इंडेक्समधील डेटा गोळा केला जातो.

मे महिन्यात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली :
मे 2022 मध्ये भारतात मोबाईल डाऊनलोड स्पीडमध्ये आधीच्या तुलनेत थोडी सुधारणा झाली. ग्लोबल मोबाइल स्पीड इंडेक्स रँकिंगमध्ये भारताने तीन स्थानांची झेप घेतली होती. जागतिक मोबाइल स्पीड इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये भारताचा सरासरी मोबाइल डाऊनलॅड स्पीड १४.१९ एमबीपीएस होता, तर मे २०२२ मध्ये तो १४.२८ एमबीपीएसपर्यंत वाढला होता.

मे महिन्यात नॉर्वे आणि सिंगापूर अव्वल स्थानावर होते :
ग्लोबल मोबाइल स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत नॉर्वे आणि सिंगापूर मे महिन्यात ग्लोबल मोबाइल स्पीड इंडेक्समध्ये अव्वल स्थानी होते. नॉर्वेचा सरासरी १२९.४० एमबीपीएससह डाउनलॉड वेग होता, तर सिंगापूर २०९.२१ एमबीपीएसच्या सरासरी डाऊनलॉड स्पीडसह सर्व देशांपेक्षा पुढे होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mobile Downloading Speed in India Speedtest Global Index 20 July 2022.

हॅशटॅग्स

#Mobile Downloading Speed(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x