16 November 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News
x

Multibagger Penny Stocks | गुंतवणूकदार झाले करोडपती, 36 पैशांच्या या शेअरने 6,64,900 टक्के परतावा दिला

Multibagger stock, jyoti resins,

Multibagger Penny Stocks | शेअर बाजारात तुम्हाला असे भरपूर पेनी स्टॉक दिसतील ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कित्तेक पत परतावा मिळवून दिला आहे. तसाच एक पेनी स्टॉक आहे ज्योती रेजिन्स अँड अॅडहेसिव्ह लिमिटेड. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 208.53% परतावा मिळवून दिला आहे.ह्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेले लोक आज करोडपती झाले आहेत आणि मागील एक महिना ह्या शेअरच्या गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त गेला आहे. मागील एक महिन्यात हा शेअर्सच्या किमती 9.51% नी वाढल्या आहेत.

हुशारीने गुंतवणूक केली तर नफा होणारच :
आपल्या सर्वांना माहीत आहे की शेअर बाजार ही अशी जागा आहे, जिथे नेहमीच धोका असतो पण हुशारीने गुंतवणूक केली तर नफा होणारच यामध्ये काही शंका नाही. लहान मोठे कोणीही असो शेअर बाजारातील तज्ञ सर्व गुंतवणूकदारांना नेहमी शहाणपणाने आणि संयमाने गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. जर गुंतवणूकदाराने स्टॉकच्या सर्व बाबी लक्षात घेऊन पैसे लावले असेल आणि त्याच्या गुंतवणुकीवर त्याचा विश्वास असेल तर नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. बाजारात असाच एक शेअर ट्रेड करत आहे ज्याची किंमत फक्त 36 पैसे होती, तुम्हाला जाणून धक्का बसेल की आजच्या काळात तो शेअर 2394 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच जर तुम्ही ह्या शेअर मध्ये 36 पैसे असताना गुंतवणूक केली असती आणि ती आजवर होल्ड करून ठेवली असती तर तुम्ही करोडपती झाला असता, तुमच्या नशिबाने कलाटणी घेतली असती. चला तर आणखी जाणून घेऊ ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह लिमिटेडच्या कामगिरी बद्दल.

वर्षानुवर्षे कामगिरी :
BSE वर 3 एप्रिल 2004 रोजी जेव्हा या शेअरची नोंद झाली तेव्हा त्याची किंमत फक्त 36 पैसे होती. आणि आता, 18 जुलै 2022 रोजी हा शेअर 2394 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच मागील 18 वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 664,900% परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना 2157.43% परतावा दिला आहे. शेअरचा भाव 2394 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. कोविडच्या काळात लॉकडाऊन मध्ये जेव्हा सर्व शेअर पडत होते तेव्हाही या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केलेली नव्हती त्याने आपली वाढ कायम राखली होती. ज्योती रेजिन्स अँड अॅडहेसिव्ह लिमिटेडच्या शेअरने मागील एका वर्षात 208.53% वाढ नोंदवली आहे. मागील एक महिना ह्या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठीही चांगला गेला आहे. यावेळी शेअर्सच्या किमती 9.51% वाढल्या आहेत.

एक लाखाच्या गुंतवणुकीवर परतावा किती?
36 पैसे किंमत असताना या स्टॉकवर विश्वास ठेवून जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्यांचा परतावा आजच्या काळात 65 कोटी रुपये झाला असता. त्याचवेळी, हा स्टॉक भविष्यात चांगली कामगिरी करू शकतो, असे वर्षभरापूर्वी कोणाला वाटत सुद्धा नव्हते. जर तुम्ही एक वर्ष पूर्वी एक लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचा परतावा तुम्हाला एका वर्षानंतर आता 3.08 लाख रुपये मिळाला असता. 3 एप्रिल 2004 रोजी या शेअरची किंमत 36 पैसे होती, तेव्हापासून आतापर्यंत ह्या शेअर ने गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपयांचे रूपांतर 66 कोटींहून अधिक मध्ये केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Penny Stocks Jyoti resins share price return on 20 July 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x