19 April 2025 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Google Pixel 6A | गुगल पिक्सेल 6 ए स्मार्टफोन भारतात लाँच, येथे ऑनलाईन खरेदी करू शकता

Google Pixel 6a

Google Pixel 6A | गुगल पिक्सेल दोन वर्षांनंतर भारतात परतला असून पिक्सेल 6 ए स्मार्टफोन भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. गुगल पिक्सेल ४ ए दोन वर्षांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला होता. मे महिन्यात गुगल आय/ओ २०२२ मध्ये पिक्सेल ६ ए लाँच करण्यात आला होता. गेल्या काही काळापासून या फोनबद्दल लीक झालेल्या बातम्या समोर येत होत्या.

फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डर करू शकता :
फ्लिपकार्टला भेट देऊन तुम्ही पिक्सेल 6A प्री-ऑर्डर करू शकता. या डिव्हाईसची डिलिव्हरी 28 जुलैपासून सुरू होणार आहे. गुगल पिक्सल 6 ए भारतात याच स्टोरेज व्हेरिएंटसह – 6 जीबी + 128 जीबीसह सादर करण्यात आला आहे. हे दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – चॉक आणि चारकोल. गुगलने हा नवा स्मार्टफोन 43,999 रुपये ठेवला आहे.

स्पेसिफिकेशन्स :
गुगल पिक्सल ६ ए मध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.१४ इंचाचा एफएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६० हर्ट्जचा रिफ्रेश रेट आणि २०:९ चा आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ देखील आहे. गुगलच्या या फोनमध्ये 5 एनएम गुगल टेन्सर चिपसेट मिळतो, जो कंपनीने सॅमसंगच्या सहकार्याने बनवला आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा सपोर्ट आहे.

बॅटरी :
गुगल पिक्सल 6 ए मध्ये 4,410 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 18 वॉट यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग फीचर असणार आहे. हे गुगलच्या नवीनतम अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. तसेच यासाठी तुम्हाला पहिले अँड्रॉईड 13 अपडेट मिळणार आहे. फोनमध्ये गुगल आपल्या इन-हाऊस टेन्सर चिपसेट देत आहे. हा स्मार्टफोन आयपी ६७ वॉटर अँड डस्ट प्रूफ आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

ड्यूल कॅमेरा सेटअप :
फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12.2 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर दिला जात आहे.

स्मार्टफोनची किंमत :
गुगल पिक्सल 6 ए ची किंमत 43,999 रुपये आहे. तुमच्याकडे अॅक्सिस बँक कार्ड असेल तर तुम्हाला 4 हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फोनच्या खरेदीवर १९ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. इतकंच नाही तर काही निवडक मॉडेल्सना 2 हजार रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Google Pixel 6A smartphone pre booking on Flipkart check details here 21 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Google Pixel 6a(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या