23 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

HDFC Mutual Funds | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 5 आकर्षक योजना, 500 रुपयांच्या SIP ने पैसे दुप्पट

HDFC mutual fund s

HDFC Mutual Funds | एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांचे दोन प्रकार आहेत. यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड यांचा समावेश आहे. आज आपण ह्या लेखात एचडीएफसी म्युच्युअल फंड मधील 5 सर्वोत्तम आकर्षक योजना बद्दल जाणून घेणार आहोत. देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे HDFC बँक. एचडीएफसी बँकचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील मोठा आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड चा व्यापार एचडीएफसी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी द्वारे चालवला जातो.

योजनांची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये :
एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांची गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये आहे. यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड यांचा समावेश आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांचा विश्वास का आहे हे म्युच्युअल फंड योजनांचा परतावा चार्ट पाहून आपण त्यांचे मूल्यांकन करू शकता. एचडीएफसीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यात 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. या योजनांचे खास वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार केवळ 500 रुपयांच्या एसआयपीने ह्या फंडमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.

एचडीएफसी स्मॉलकॅप फंड :
एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात सरासरी वार्षिक 22.24 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत गेल्या पाच वर्षांत 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूकीचे रूपांतर आता 2.73 लाख रुपये मध्ये झाले आहे. तर, 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे चे मूल्य आज 11.40 लाख रुपये झाले आहे. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपयांपासून सुरू होते, तर SIP गुंतवणूक किमान 500 रुपयांपासून करता येते. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाची मालमत्ता 31 डिसेंबर 2021 रोजी 13,649 कोटी रुपये होती, तर खर्चाचे प्रमाण 0.83% नोंदवले गेले होते.

एचडीएफसी सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी योजना:
एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी योजनेत गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांमध्ये सरासरी 19.32 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. या योजनेत गेल्या पाच वर्षांत 1 लाख रुपयांची केले एकरकमी गुंतवणूक आज 2.42 लाख रुपये झाली आहे. तर, 10,000 रुपये मासिक SIP चे मूल्य आज 10.60 लाख रुपये झाले आहे. या योजनेत गुंतवणुकीची सुरुवात किमान 5000 रुपयांपासून करता येते, तर किमान 500 रुपयांची SIP ने गुंतवणूक सुरुवात करता येते. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी सेवानिवृत्ती बचत निधी इक्विटी योजनेमध्ये 2,029 कोटी रुपयांची मालमत्ता संकलित झाली होती, तर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.91% होते.

एचडीएफसी इंडेक्स फंड – सेन्सेक्स योजना:
एचडीएफसी इंडेक्स फंड सेन्सेक्स प्लॅनमध्ये मागील 5 वर्षांत गुंतवणुकदाराना सरासरी 18.32 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. या योजनेत मागील पाच वर्षांत 1 लाख रुपयांची केलेली एकरकमी गुंतवणूक आज 2.32 लाख रुपये झाली आहे. तर, 10,000 रुपये मासिक SIP ने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य आज 9.79 लाख रुपये झाले आहे. तुम्ही या योजनेची सुरुवात किमान 5000 रुपयांची गुंतवणूक करून करू शकता, तर किमान 500 रुपयांची SIP ने गुंतवणूक करता येते. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी इंडेक्स फंड सेन्सेक्स योजने एकूण संकलित मालमत्ता 2,915 कोटी रुपये होती, तर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.20% एवढे मोजण्यात आले आहे.

एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 योजना:
एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 योजनेत गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत सरासरी वार्षिक 17.59 % परतावा मिळाला आहे. या योजनेत ज्या गुंतवणूकदारांनी मागील पाच वर्षांत 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 2.25 लाख रुपये झाले आहेत. तर, 10,000 रुपये मासिक SIP ने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य आज 9.71 लाख रुपये झाले आहे. या योजनेत गुंतवणुकीची सुरुवात किमान 5000 रुपयांपासून करता येते, तर किमान 500 रुपयांची SIP ने गुंतवणूक करता येते. 31 डिसेंबर 2021 रोजी एचडीएफसी इंडेक्स फंड निफ्टी 50 योजनेचे केलेल्या मूल्यांकन नुसार एकूण मालमत्ता 4,434 कोटी रुपये गणली गेली होती, तर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.20% टक्के होते.

एचडीएफसी मिड-कॅप फंड योजना :
एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात ह्या फंडच्या माध्यमातून सरासरी 17.18 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. या योजने अंतर्गत गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांची केलेली 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक आज 2.21 लाख रुपये झाली आहे. तर, ज्या गुंतवणूकदारांनी 10,000 रुपये मासिक SIP मध्ये गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य आज 10.18 लाख रुपये झाले आहे. या योजनेची सुरुवात तुम्ही किमान 5000 रुपयांपासून करू शकता, तर किमान 500 रुपयांची SIP ने गुंतवून सुरुवात करता येते. 31 डिसेंबर 2021 रोजी केलेल्या मूल्यांकन नुसार एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची एकूण मालमत्ता 31,442 कोटी रुपये गणली गेली होती, तर त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.98% आहे असे आकडेवारीतून समोर येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: HDFC Mutual Funds for long term investment schemes with SIP benefit on 21 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x