23 November 2024 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

VIDEO | कोणाच्या सांगण्यावरून खोटे आरोप?, बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा हा ९ महिन्यापूर्वीच व्हिडिओ पहा

VIDEO

VIDEO | बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.

तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करताना सुहास कांदे म्हणाले, ‘ एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात वयाच्या १८ व्या वर्षापासून राजकारण आणि समाजकारण सुरु केलं. त्यांना नक्षल्यांनी मारण्याची भूमिका दिला. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, सीआयडी असेल.. यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला रिपोर्ट केले. त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदेंची सिक्युरिटी वाढवली नाही.

मात्र शिंदेंच्या सुरक्षेवरून याच नेत्यांच्या जुन्या प्रतिक्रिया समोर येतं आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जसे आरोप करणारे नेते नेमण्यात आले होते तेच तंत्र शिंदे यांनी आत्मसात केलं आहे का अशी शंका व्यक्त होतं आहे. तत्कालीन गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईं यांनी स्वतः यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा लगेच वाढविण्यात आली होती. तसेच गृहविभाग पूर्ण काळजी घेत असल्याचं म्हटलं होतं. मात्र हेच नेते आता केवळ खोटे करण्यासाठी पुढे येत आहेत असं देखील हळूहळू समोर येतंय असंच म्हणावं लागेल. केवळ शिंदेंना प्रकाशझोतात ठेवणं आणि भावनिक वातावरण निर्माण करण्याचा हा राजकीय खटाटोप असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

काय म्हटलं होतं तत्कालीन गृहराज्य मंत्री शंभूराज देसाईं यांनी ते पहा :

मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही’
शंभूराजे देसाई असू किंवा मी असू हे निर्णय घेत नाही. एसआयडीचा रिपोर्ट आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO of former Home minister for state Shambhuraj Desai on Eknath Shinde security check details 22 July 2o22.

हॅशटॅग्स

#VIDEO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x