29 April 2025 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Travel Festival Sale | एअर तिकीट बुकिंगवर 15% पर्यंत सूट, कसा घ्यावा फायदा ते समजून घ्या

Travel Festival Sale

Travel Festival Sale | जर तुम्ही कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर पेटीएमच्या माध्यमातून एअर तिकीट बुकिंगवर 15 टक्क्यांपर्यंत बचत करता येईल. पेटीएमच्या मालकीची पेमेंट्स अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने २१ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत ‘ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेल’ची घोषणा केली आहे.

विमानांच्या बुकिंगवर आकर्षक डील आणि स्पेशल कॅशबॅक :
‘ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेल’ अंतर्गत विमानांच्या बुकिंगवर आकर्षक डील आणि स्पेशल कॅशबॅक देण्यात येणार आहे. इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, गोएअर आणि एअर एशिया अशा सर्व प्रमुख विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर ही ऑफर आहे. हा सेल २१ जुलैपासून सुरू झाला असून, याअंतर्गत तुम्ही उद्या म्हणजे २३ जुलैपर्यंत स्वस्त तिकीट बुक करू शकता.

किती बचत होईल :
१. पेटीएमच्या या ऑफर अंतर्गत इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, गोएअर आणि एअरएशियाच्या माध्यमातून देशांतर्गत उड्डाणांवर 15 टक्के सूट मिळू शकते.
२. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकीट बुकिंगवर 10 टक्के सूटचा लाभ मिळू शकतो.
३. ही ऑफर एचएसबीसी कार्डधारकांना उपलब्ध आहे म्हणजेच या माध्यमातून तुम्हाला देशांतर्गत उड्डाणांवर 15 टक्के आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 10 टक्के सूट मिळू शकते.
४. या कंपनीत अतिरिक्त सवलतीसह सैन्य दल, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष भाड्याची तरतूद आहे.

बसच्या तिकिटांवरही खास ऑफर्स :
सेल दरम्यान, कंपनीने अॅपद्वारे बस तिकीटासाठी आकर्षक ऑफर सादर केल्या आहेत. याअंतर्गत अॅपद्वारे बसचे तिकीट बुक करताना तुम्ही १५ रुपयांची बस कॅन्सलेशन सिक्युरिटी खरेदी केली असेल तर तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला पूर्ण पैसे म्हणजेच १०० टक्के रिफंड मिळू शकतो. पेटीएम देशभरातील अडीच हजारांहून अधिक बस ऑपरेटर्सकडून तिकीट सेवा देते. याशिवाय तुम्ही अॅपवर पहिल्यांदा बसचं तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला 20 टक्के कॅशबॅक मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Travel Festival Sale on Paytm from 21 July To 23 July 2022 check details 22 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Travel Festival Sale(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या