22 November 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Gold ETF Funds | गुंतवणुकीसाठी सुरक्षित ईटीएफ फंड कसे निवडावे?, गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ETF funds investment

Gold ETF Funds | तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुक आणि त्यावर चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर ईटीएफ फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय असू शकतो. ईटीएफ फंड स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातात आणि त्यांचे शेअर्सप्रमाणे खरेदी विक्री व्यवहार केले जातात. यासाठी म्युच्युअल फंड सारखे सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची गरज नसते, म्हणून ही एक निष्क्रिय इक्विटी गुंतवणूक मानली जाते.

ईटीएफ फंडचे प्रकार:
भारतीय गुंतवणूक बाजारात साधारणपणे पाच प्रकारचे ईटीएफ गुंतवणूक फंड उपलब्ध आहेत. गोल्ड ईटीएफ फंड, इंडेक्स ईटीएफ फंड, बाँड ईटीएफ फंड, सिल्व्हर ईटीएफ फंड आणि इंटरनॅशनल ईटीएफ फंड हे ETF फंड चे पाच प्रकार आहेत.

गुंतवणुकीची पद्धत:
ETF चे खरेदी आणि विक्री व्यवहार आणि गुंतवणूक स्टॉक मार्केटमध्ये शेअर प्रमाणेच केली जाते. ईटीएफ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ब्रोकरमार्फत डीमॅट खाते उघडावे लागेल. ईटीएफची किंमत रिअल टाइम म्हणजे चालू वेळेत वर किंवा खाली जाऊ शकते. हे त्यातील होणाऱ्या व्यवहारावर अवलंबून आहे. ETF फंड गुंतवणूक हे म्युच्युअल फंड युनिट किमतीच्या पूर्णपणे उलट आहे, हे सर्व व्यवहार फक्त ट्रेडिंग सेशनच्या शेवटी सेटलमेंट केले जाते.

गुंतवणूक करण्यापूर्वी या निकषवर ईटीएफ फंड तपासा :

1. ETF फंड निवडताना किंवा गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी त्यातील उपलब्ध तरलता, कमी खर्चाचे प्रमाण, कमी परिणाम खर्च, ट्रॅकिंग रेकॉर्ड आणि अंतर्निहित सिक्युरिटीज या धोरणावर अवलंबून राहावे.

2. ईटीएफ फंडच्या तरलतेमुळे गुंतवणूकदारांना स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी किंवा विक्री व्यवहार करणे आणि गुंतवणूक करणे सोपे होईल.

3. साधारणपणे, ETF चे खर्चाचे गुणोत्तर सक्रिय फंडांपेक्षा कमी असते परंतु गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या ETF च्या खर्चाच्या गुणोत्तरांची आपापसात तुलना करूनच गुंतवणूक केली पाहिजे.

4. कोणताही ईटीएफ फंड गुंतवणुकिसाठी निवडताना कमी ट्रॅकिंग त्रुटी हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हे निर्देशांकाच्या तुलनेत परताव्यातील फरक कमी करण्यास मदत करते. साधारणपणे, 2 टक्के ट्रॅकिंग त्रुटी प्रमाण अंतर्निहित सिक्युरिटीजसाठी आदर्श मानली जाते.

5. ईटीएफ फंड निवडताना सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर म्हणजे अंतर्निहित सिक्युरिटीज आहे कारण आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा त्याच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

6. सोने आणि आंतरराष्ट्रीय ETF अश्या नॉन-इक्विटी ETF मध्ये केलेली गुंतवणूक 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीची असेल तर तिला अल्प मुदतीची गुंतवणूक मानली जाते, तर 3 वर्षांहून अधिक काळ केलेली गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. तुमच्या नॉन-इक्विटी ETF फंड च्या गुंतवणुकीत STCG वर नाममात्र दराने कर आकारला जातो. तुम्ही केलली गुंतवणूक नॉन-इक्विटी ETF असेल तर त्याच्या LTCG वर इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% कर आकारला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ETF Funds Investment schemes and benefits on 22 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x