22 November 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

खरी शिवसेना कुणाची? | शिंदे गटाकडून शिवसैनिकांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न, शिवसैनिकांने असं झापलं ऐका

Eknath Shinde

Shivsena Political Party | खरी शिवसेना कुणाची ८ ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना दिले आहेत. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोसळलं. कारण शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झालं आहे. आता शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेही यांनीही शिवसेना आमचीच म्हणणारे लोक जे आहेत त्यांना भुलू नका म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढली आहे. आता शिवसेना नेमकी कुणाची ते सिद्ध करा हे निवडणूक आयोगाने म्हटलंय.

हे बेकायदेशीर सरकार पडणार मला माहित आहे-आदित्य ठाकरे
हे सरकार चालणार नाही पडणार आहे हे मी सांगतो आहे. आम्ही स्वतःचं इमान विकलेलं नाही. आमच्या समोर विधानभवनात गद्दार बसले होते. ते आमच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते. या सगळ्यांचे मुखवटे फाटले आहे. उद्धव ठाकरेंबाबत, आदित्य ठाकरेंबाबत प्रेम आहे हे सांगत होते. आता त्यांची वक्तव्य पाहा ते आता खरं बोलत आहेत. लोकशाहीचं खरं शस्त्र मतदान आहे. गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये केलं आहे.

शिवसैनिकांना शिंदे गटाकडून आमिष देण्यास सुरुवात, ऑडिओ व्हायरल :
दरम्यान, सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत असल्याने त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. धुळ्यातील एका शिवसैनिकाला शिंदे गटातील पदाधिकाऱ्याने शिंदे गटात येण्यासाठी फोन केला. पण त्या कट्टर शिवसैनिकाने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला कसे झापले आणि वास्तवाला धरून कडे मुद्दे पुढे केले तुम्हीच या ऑडिओ क्लिपमध्ये ऐका,

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde Group Vs Shivsena check details 23 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x