22 November 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tax on Saving Schemes | या आहेत पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना, गुंतवणूक करा, पैसा वाढवा आणि टॅक्स सूट मिळवा

tax saving schemes

Tax on Saving Schemes | आपण गुंतवणूक करताना नेहमी काही चुका करतो पण त्या चुका जर टाळल्या तर आपण गुंतवणुकीचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो. नेहमी गुंतवणूक करताना दोन गोष्टींची काळजी घ्या. गुंतवणुकीचा पर्याय तुम्हाला महागाई दरापेक्षा जास्त परतावा देतो आहे की नाही. उदाहरणार्थ, जर महागाईचा दर 7 टक्के असेल तर तुम्हाला गुंतवणुकीतून त्यापेक्षा जास्त परतावा मिळतो आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, रिटर्नवरील कर दायित्व जास्त नसावे. करांमुळे तुमचा परतावा कमी होतो. लहान बचत योजनामध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करून पैसे बचत करतात. परंतु रिटर्नवर किती कर आकारला जातो हे आपल्याला माहित नसते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
पीपीएफ मध्ये मिळणाऱ्या कर सवलत लाभाचे तीन प्रकार आहेत. या योजनेत, कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत दिली जाते. ह्या योजनेअंतर्गत मुदतपूर्तीच्या वेळी काढलेले जे पैसे असतील त्यावरचे व्याज परतावा देखील पूर्णपणे करमुक्त असते.

सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजनेचा दर्जा देखील EEE असा आहे. ह्याचा अर्थ असा की तुम्ही ह्या योजनेत गुंतवणूक केली की ती आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त असेल. आपण ह्या योजनेत आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत केलेली गुंतवणूकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे. त्याच वेळी, जर आपल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस आकारला जाईल.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे :
जर आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की ही गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत उपलब्ध करून देते. त्याच वेळी, या योजनेतील मुदतपूर्तीवर मिळणाऱ्या परतव्यावर कर आकारला जातो. गुंतवणूकदाराच्या एकूण वार्षिक परताव्यात भरघोस व्याजाची भर पडते.

मुदत ठेव योजना आणि आवर्ती ठेव योजना :
टाईम डिपॉझिट स्कीम जी इंडियन पोस्ट मार्फत संचालित केली जाते, ही योजना बँकेच्या एफडी सारखी आहे. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत केवळ पाच वर्ष कालावधीच्या ठेवीवर उपलब्ध आहे. आणि आवृत्ती ठेव योजना ही एक अतिशय लोकप्रिय अशी लहान बचत योजना आहे. या योजनेत मिळणारा व्याज परतावा गुंतवणूकदाराच्या वार्षिक एकूण परताव्यात जोडले जाते, आणि त्यावर आयकर स्लॅबच्या आधारावर कर आकारणी होते.

मासिक उत्पन्न योजना आणि किसान विकास पत्र :
मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर आपल्याला कोणतीही आयकर सवलत मिळत नाही. तरी व्याज परतावा उत्पन्न कर सवलत पात्र आहे. आणि किसान विकास पत्रामध्ये जर आपण पैसे गुंतवले तर त्या गुंतवणुकीवर आयकर सवलतीचा कोणताही लाभ मिळत नाही. तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा व्याज परतावा तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाईल आणि, त्यावर तुम्हाला आयकर स्लॅबनुसार कर आकारला जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tax on Saving Schemes of Post office check benefit on 23 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x