23 November 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Income Tax Return | तुमच्या या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही, रिटर्न भरण्यापूर्वीच गोष्टी जाणून घ्या

Income Tax Return

Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता संपली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असून त्यानंतर करविवरण पत्र भरल्यास दंड होऊ शकतो. तसे पाहिले तर देशातील प्रत्येक नागरिक, जो पगार किंवा व्यवसायाच्या रूपाने उत्पन्न मिळवत आहे, त्याने आयकर विवरणपत्र भरावे, परंतु आयकर विभागाच्या तरतुदींनुसार असे काही उत्पन्नही आहे जेथे करसवलत मिळते. जर तुम्ही आयकर भरत असाल तर कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही, हे जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. येथे प्राप्तिकर कलम ८० सी आणि ८०यू ही मोठी भूमिका बजावतात.

५० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू :
भेटवस्तूंवर कर लावणे हे अगदी सामान्य आहे. पंतप्रधान नेहरू यांच्या काळापासून गिफ्ट टॅक्स आकारला जात आहे. पण इथे एक तरतूद आहे आणि ती म्हणजे तुम्हाला महागडी भेट मिळाली असेल पण तिची किंमत फक्त 50 हजार रुपये असेल तर त्यावर कर लागणार नाही. मात्र महागड्या भेटवस्तूंवर कर भरण्याची तरतूद आहे, ती तुम्हाला आयटीआरमध्ये इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात दाखवावी लागेल.

पीएफ आणि ग्रॅच्युइटी :
पीएफ आणि ग्रॅच्युइटीसारख्या उत्पन्नावरही कर आकारला जात नाही. जरी त्यात काही अटी आहेत. पीएफ कापून 5 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तो करमुक्त होईल. पण 5 वर्षांपूर्वी पीएफ काढण्यावर 10 टक्के टीडीएस आकारला जाईल. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी पूर्णपणे करमुक्त राहते. परंतु खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना केवळ १० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर करसवलत मिळते.

शेतीतून मिळणारे उत्पन्न :
प्राप्तिकरातील तरतुदींनुसार देशातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर आकारला जात नाही, पण शेती प्रक्रियेसह अन्य स्रोतांतून उत्पन्न येऊ लागले, तर त्यावर कर आकारला जातो. अशा परिस्थितीत इतर स्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणी होऊन शेतीतून मिळणारे उत्पन्न करमुक्त होईल.

शिष्यवृत्ती :
शिष्यवृत्ती ही राज्य व केंद्र सरकार देते, पण ती एकप्रकारे उत्पन्न म्हणूनही मानली जाते. पण महत्त्वाचं म्हणजे त्यावर इन्कम टॅक्स नाही. आयकर कलम ५६ (२) अन्वये शिष्यवृत्तीचे पैसे करमुक्त असतात.

शौर्य पुरस्कार :
देशात महावीर चक्र, परमवीर चक्र, वीरचक्र असे शौर्य पुरस्कार घेणाऱ्या लोकांना त्यांच्या पेन्शनवर कर मिळत नाही. याशिवाय अशा लोकांची फॅमिली पेन्शनही करमुक्त असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income Tax Return investment need to know check 25 July 2022.

हॅशटॅग्स

#Income Tax Return(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x