22 November 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Viral Video | आई शेवटी आईच असते, सापाने उंदराच्या पिल्लाला पकडले, समोर आली उंदराची आई आणि झालं असं..

Viral Video

Viral Video | साप दिसताच भल्या-भल्यांची अवस्था बिकट होते. सापांना पाहून मानवच नव्हे, तर प्राणीही घाबरतात. काही अपवाद सोडले तर साप सगळ्यांवर भारी पडतो. मात्र, एखाद्याने आपल्या पिल्लांवर आईसमोर हल्ला केला तर, तर समोर कितीही ताकदवान असला तरी आई तिचा सामना करते. व्हायरल होणारा नवीन व्हिडिओ साप आणि उंदरांशी संबंधित आहे. यात तुम्हाला दिसेल की, एक साप उंदराच्या पिल्लाला तोंडात पकडून पळ काढत होता, पण त्याचवेळी उंदराची आई आली आणि तिने सापाचा सामना केला.

उंदराच्या पिल्लाची आई सापाला भिडते :
यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक खतरनाक साप उंदराच्या पिल्लाला शिकार करून घेऊन जात होता. पण उंदराने तिची नजर चुकवली आणि तिने धावत येऊन सापावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेला साप उंदराच्या पिल्लाला तिथेच सोडून पळून जाऊ लागतो. पण इथेही उंदीर सापाच्या मागे लागते आणि सापाला हुसकावून लागेपर्यंत त्याचा पाठलाग केला जातो. अशाप्रकारे उंदराची आई आपल्या पिल्लाचे प्राण वाचवते.

शेवटी साप पळून गेला :
उंदराच्या हल्ल्यातून साप सावरू शकत नाही आणि लवकरात लवकर आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातो. हा व्हिडिओ @DoctorAjayita नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. “आश्चर्यकारक! उंदराने सापाशी लढा दिला आणि आपल्या मुलाला वाचवले,” त्याने लिहिले. 50 सेकंदाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Rat fighting with Snake check details 25 July 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x