22 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

PPF Investment | केवळ स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड नव्हे तर पीपीएफ गुंतवणुकीतूनही अशाप्रकारे कोटीमध्ये परतावा मिळेल

PPF investment

PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारमार्फत नियोजन आणि व्यवस्थापन केली जाणारी योजना आहे. ही योजना सरकारने लहान गुंतवणूकदार तसेच पगारी लोकांसाठी सुरू केली होती. जेणेकरून ते आपल्या वेतनातून काही वाटा बचत किंवा गुंतवणूक करू शकतील. या गुंतवणुकीत पैसे गमावण्याची शक्यता नगण्य आहे कारण त्याला सरकारने हमी आणि सुरक्षा पुरवली आहे.

PPF कॅल्क्युलेटर :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना सरकारने सुरू केली होती. या योजनेत कोणत्याही प्रकारचे जोखीम नाही. तसेच, जर आपण या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची कर सवलत मिळेल. सध्या सरकारत्तर्फे या योजनेत 7.10 टक्के व्याज परतावा दिला जातो. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडपती कसे होऊ शकता याची माहिती आपण या लेखात घेऊ

गुंतवणूक तज्ञांच्या मते :
कर आणि गुंतवणूक तज्ञांच्या मते, आपण PPF योजनेअंतर्गत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. आणि जर आपल्याला यात वाढ करायची असेल तर आपण 5-5 वर्षांनी पुढे वाढवू देखील शकता. म्हणजेच, येथे कोणतीही व्यक्ती 15 वर्षानंतरही गुंतवणूक सुरू ठेवू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही या योजनेत योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपती देखील होऊ शकता.

दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक :
या योजनेद्वारे करोडपती होण्याच्या प्रश्नावर कर आणि गुंतवणूक तज्ञ म्हणतात की, “जर तुम्हाला या योजनेद्वारे करोडपती बनायचे असेल तर तुम्हाला १.५० लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल. जेवढी जास्त गुंतवणूक, तेवढा जास्त परतावा. PPF गुंतवणुकीत तुम्ही दर 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढ करू शकता. सुरुवातीला 15 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर, 5-5 वर्षे आणखी वाढवून तुम्ही त्यात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

करोडपती होण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? :
समजा सरकारने PPF वरील सध्याचा 7.1 टक्के व्याजदर परतावा कायम ठेवल्यास, तुम्हाला वार्षिक 1,08,000 रुपये गुंतवणूक करावे लागतील. म्हणजेच पुढील तीस वर्षासाठी तुम्हाला महिन्याचे 9 हजार रुपये त्यात गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक पुढील 30 वर्षे चालू ठेवली तर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 32,40,000 रुपये होईल, ज्यावर तुम्हाला 78,84,656 रुपये व्याज परतावा मिळेल. परंतु लक्षात ठेवा की 15 वर्षांनंतर तुम्हाला योजनेचा कालावधी दर 5 वर्षांनी तीन वेळा वाढवावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF Investment opportunity to invest for long term in 26 July 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x