15 November 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

Samsung Galaxy S20 FE 5G | सॅमसंगच्या प्रीमियम 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर, 18 हजार रुपयांपर्यंत सूट

Samsung Galaxy S20 FE 5G

Samsung Galaxy S20 FE 5G | सॅमसंगचा प्रीमियम फोन गॅलेक्सी एस २० एफई 5G जबरदस्त डील्स आणि ऑफर्ससह कंपनीच्या वेबसाइटवर खरेदी करता येईल. या फोनवर सॅमसंग 15,999 रुपयांचा बंपर डिस्काउंट देत आहे. हा फोन गेल्या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचिंगवेळी याची किंमत 55,999 रुपये होती. आता हा फोन 15,999 रुपयांच्या बंपर डिस्काउंटनंतर ४० हजार रुपयात खरेदी करू शकता. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेच्या कार्डाने पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅकही मिळणार आहे. या दोन्ही ऑफर्स एकत्र केल्यास फोनवरील एकूण डिस्काउंट १८ हजार रुपये (17,999 रुपये) होतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
फोनमध्ये कंपनी 1080×2400 पिक्सल रेझ्युलेशनसह 6.5 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 मिळणार आहे.

रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे :
फोटोग्राफीसाठी कंपनी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

४५०० एमएएचची बॅटरी :
फोनला पॉवर देण्यासाठी यात ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज, कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samsung Galaxy S20 FE 5G smartphone online offer check details 26 July 2022.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy S20 FE 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x