17 April 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

योगी आणि फडणवीसांच्या विरोधात भाजपमधील गुजरात लॉबी कार्यरत? | नेमका राजकीय गेमप्लॅन काय ते जाणून घ्या

BJP Gujarat Lobby

Devendra Fadnavis | 2014 ते 2019 या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केले आहे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रालयांच्या विभागणीतही हायकमांड देवेंद्र फडणवीसांना फ्रीहँड देण्याच्या मन:स्थितीत नाही, अशा बातम्या आता येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाची सरकारवर मजबूत पकड तर असली पाहिजेच, शिवाय पक्षातही सहभागी राहिले पाहिजे, अशी भाजपमधील गुजरात लॉबीची योजना असल्याचं समजतंय. शिवसेनेतून आलेल्या बंडखोरांपैकी ते अपक्ष आमदारांमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचं आणि कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय गुजरात लॉबी घेणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. भाजपमधील गुजरात लॉबी विशेषकरून मुंबईच्या आमदारांवर लक्ष केंद्रित करून आहे असं देखील वृत्त आहे.

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची चांगली पकड आहे, हे गुजरात लॉबीला माहिती आहे, त्या ठिकाणी भाजपाला मजबूत करून शिंदेंना नंतर गुंडाळायचं अशी मोठी योजना गुजरात लॉबीने आखली आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात गुजरातच्या विश्वासातील आयएएस लॉबी देखील नियुक्त केली जाईल असं वृत्त आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांची ताकद असलेल्या ठाणे पट्टयात शिंदेंचा प्रभाव संपुष्टात आणून इकडचे स्थानिक नेते सुद्धा शिंदेंच्या विरोधात तयार करण्याची मोठी योजना भाजपमधील गुजरात लॉबीने आखली आहे. याचा मूळ उद्देश हा मुंबई आणि ठाणे ही राज्यातील दोन प्रमुख शहरं गुजरात लॉबीला स्वतःच्या प्रभावाखाली हवी आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक लॉबी तयार करून फडणवीसांचं राज्य आणि देशातील भाजपात असलेलं महत्व कमी करण्याचा घाट गुजरात लॉबीने घातल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. आयत्यावेळी उपमुख्यमंत्री पद देऊन फडणवीसांचा राजकीय अपमान करून त्यासंबंधित बातम्या देशभर मीडियात पसरवन, यामागे देखील हीच गुजरात लॉबी होती असं म्हटलं जातंय.

मोदी यांच्या नंतर कोण असा प्रश्न गुजरात लॉबीपुढे :
मोदी यांच्या नंतर कोण असा प्रश्न गुजरात लॉबीपुढे असल्याने २०२४ नंतरच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रात फडणवीस यांच्या विरोधात गुजरात लॉबी पूर्णपणे कार्यरत झाल्याचं वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीनंतर योगी सरकारमधील मंत्र्यांचे अचानक आलेले राजीनामे आणि त्यांनी योगी यांचावर केलेली टीका हा त्याचाच भाग होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एक गट कार्यरत झाला असून हा गट अमित शहा यांच्या सांगण्यावर काम करत असल्याचं म्हटलं जातंय. तसेच महाराष्ट्रात आयत्यावेळी म्हणजे शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्यानंतर आणि मी बाहेरून सरकारला मार्गदर्शन करणार असं फडणवीसांनी जाहीर करताच काही मिनिटात ठरल्याप्रमाणे भाजप मधील गुजरात लॉबी कार्यरत झाली आणि फडणवीसांचा ठरल्याप्रमाणे राजकीय गेम केला हे लपून राहिलेलं नाही. त्यानंतर ते आजपर्यंत फडणवीसांची बदलेली बॉडिलॅंग्वेज सुद्धा बरंच काही स्पष्ट करत आहे.

पक्षातील फडणवीस विरोधकांना महत्त्वाची पदे देण्याची तयारी :
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात पक्ष मजबूत झाला आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या काळात भाजप निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत हायकमांड समतोल साधण्याचा प्रयत्न करत असून याअंतर्गत अशा काही नेत्यांना महत्त्वाची भूमिका मिळू शकते, जी आतापर्यंत पक्षात काठावर होती. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं, असं भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं. याशिवाय मंत्रिमंडळात आणखी काही नेत्यांचा प्रवेश होऊ शकतो, जे फडणवीसांनी गोटातील नसतील. तसेच फडणवीस यांच्या राज्यातील कट्टर समर्थकांवर देखील गुजरात लॉबीचे लक्ष असल्याचे वृत्त आहे.

अमित शहा यांच्या नैत्रुत्वात गुजरात लॉबी कार्यरत झाली आहे आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पत्रकार दीपक शर्मा यांनी केलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पहा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Gujarat Lobby active against CM Yogi and DCM Devendra Fadnavis check details 27 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या