22 November 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

Viral Video | प्रचंड पुराच्या पाण्यात हत्ती स्वतः बुडत होता, पण माहुतची काळजी घेत होता, व्हायरल व्हिडिओ नक्की पहा

Viral Video

Viral Video | असे म्हणतात की, जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम केले नाही, तर ते तुमच्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा देतील. पण तुम्हाला एखाद्या त्रासापासून सोडवण्यासाठी ते स्वतः सर्व त्रास सहन करतील. व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडिओवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ हत्ती आणि माहुतचा आहे. नदीच्या पुरात अडकूनही हत्तीण आपल्या माहुताचा जीव वाचवण्यासाठी स्वतःवर अधिक त्रास ओढवून घेत आहे असं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती उसळत्या गंगेला पार करताना दिसत असून त्याच्या पाठीवर माहुत बसलेला दिसत आहे.

स्वतःपेक्षा माहुतची विशेष काळजी :
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मंगळवारी माहुत हत्तीला घेऊन राघोपूर परिसरात गेला होता. त्यानंतर रुस्तमपूर घाटातून (गंगा नदी) हत्तीला घेऊन पाटण्याला परतत असताना अचानक गंगेचे पाणी वाढले. मात्र परिस्थिती भीषण असूनही हत्तीने हार मानली नाही आणि आपल्या पाठीवर बसलेल्या माहुताला सुरक्षित पोहून सुखरूप नदी काठावर पोहले. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हत्ती नदीच्या मधोमध अनेक वेळा पाण्यात बुडताना दिसत होता, पण लाटांनी उसळणाऱ्या गंगेत मात्र त्याने माहुतला त्रास होणार नाही याची अधिक काळजी घेतली. हत्ती स्वतः त्रास सहन करून अखेर माहुताला नदी किनारी सुखरूप घेऊन आल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय

हत्तीच्या प्रेमापुढे नेटिझन्स फिदा :
असे म्हटले जाते की हत्ती सुमारे दोन किलोमीटर पोहत राहूई घाटावर पाटण्याला रवाना झाला होता. या दरम्यान बोटीने जाणाऱ्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक विविध प्रकारच्या गोष्टींवर चर्चा करत आहेत. उल्लेखनीय म्हणजे पावसाळ्यात राज्यातील नद्यांना पूर येतो. चला जाणून घेऊया की हत्तीचा हा व्हिडिओ @UtkarshSingh_ नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे..

नेमका व्हिडिओ काय आहे पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Elephant taking care Mahavat in flood check details 28 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x