27 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Mutual Funds | फक्त 10 हजार गुंतवणूक करा आणि लाखो रुपये परतावा मिळवा, हा म्युचुअल फंड देत आहे धमाकेदार परतावा

mutual funds, investment, gain, profit

Mutual fund | एक्विटी मार्केट मध्ये पडझड सुरू आहे म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे वळत आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. उच्च परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे अधिक आकर्षित होत असतात. म्युच्युअल फंड एसआयपीचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम बचत करतो आणि त्याला दीर्घ काळासाठी गुंतवतो. गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुक करण्याची गरज नाही. SIP मध्ये मासिक पैसे जमा करण्याची सुविधा दिली जाते.

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर :
कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड, डायरेक्ट प्लॅन फेब्रुवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आला आणि या योजनेने सुरुवातीपासूनच आपल्या गुंतवणूकदारांना 28.65 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. आणि 131.4 टक्के परिपूर्ण परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात, या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 20.25 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या दोन वर्षांत सुमारे 59.50 टक्के वार्षिक परतावा आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे.

तीन वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेत 32 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. SIP मध्ये मासिक 10,000 गुंतवून 6.31 लाख रुपये निधी जमा होऊ शकतो. हे कसे होईल ते जाणून घेऊ

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड योजनेत एक वर्षापूर्वी 10,000 मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमची गुंतवणूक वाढून रु. 1.19 लाख झाली असती. दुसरीकडे, जर दोन वर्षांपूर्वी या योजनेत 10,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली असती, तर आज तुमची गुंतवणूक 3.37 लाख रुपयांपर्यंत वाढली असती. त्याचप्रमाणे, 3 वर्षांपूर्वी सुरू केल्याने ही रक्कम आज 6.31 लाख रुपये झाली असती. या योजनेत गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळाला आहे. म्युचुअल फंड योजनेत चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या परताव्याचा गुंतवणूकदारांना अधिक फायदा होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds investment returns and benefit on 29 July 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Fund Investment(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x