22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Moto G32 Smartphone | मोटोरोलाचा मोटो G32 स्मार्टफोन लाँच, 50 मेगापिक्सल कॅमेरासह दमदार प्रोसेसर

Moto G32 Smartphone

Moto G32 Smartphone | मोटोरोलाने आपल्या जी सीरीजमध्ये मोटो G32 हा नवा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. मोटो जी ३२ सध्या निवडक युरोपियन बाजारात लाँच करण्यात आला आहे. लवकरच भारत आणि लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा फोन अनेक भन्नाट फिचर्सने सुसज्ज आहे. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येईल.

50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा :
मोटो G32 मध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळतो. याची किंमत २१० युरो (सुमारे १८ हजार रुपये) इतकी आहे. मोटो G32 मिनरल ग्रे, सॅटिन सिल्व्हर आणि रोज गोल्ड या तीन कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

स्पेसिफिकेशन्स :
मोटो G32 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 एसओसी प्रोसेसरसह येतो, जो 4 जीबी रॅमसह जोडला गेला आहे. फोनमध्ये १२८ जीबी एक्सपेंडेबल स्टोरेज आहे. मोटो जी 32 मध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30 वॉट टर्बोपॉवर चार्जिंग सपोर्टसह येते. हा हँडसेट अँड्रॉइड १२ वर चालतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एलसीडी पॅनल मिळतो. फोनमध्ये उपलब्ध डिस्प्ले फुल एचडी+ रिझॉल्यूशनसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि यूएसबी-सी पोर्ट आहे.

सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा :
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. मोटो जी ३२ हेडफोन जॅकसह ड्युअल स्टिरिओ स्पीकर्ससह देखील येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट रीडर आणि वॉटर रिपेलेंट डिझाइन देण्यात आले आहे.

किंमत :
मोटो G32 च्या ४ जीबी+१२८ जीबी मॉडेलची किंमत २३० युरो (अंदाजे १८,६५० रुपये) आहे. मोटोरोला G32 लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे, मात्र त्याच्या लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मोटो G32 ला रोझ गोल्ड, सॅटिन सिल्वर आणि मिनरल ग्रे रंगात ऑफर करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Moto G32 Smartphone launched check price details 29 July 2022.

हॅशटॅग्स

#Moto G32 Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x