21 April 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
x

ठाकरेंच्या नावा आडून भेटीचा स्क्रिप्टेड स्टंट? | भाजप नेत्याचे जावई तसेच काँग्रेस महिला नेत्याचे पती निहार ठाकरे आणि शिंदेंमध्ये भेट पण...

Neeraj Thackeray

Neehar Thackeray | एकनाथ शिंदे यांना आता उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे यांची साथ लाभली आहे. निहार ठाकरे यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी यावर आपलं मतही मांडलं आणि माध्यमांवर ठाकरे कुटुंबीय शिंदेंसोबत असल्याच्या हेडलाईन झळकल्या.

निहार ठाकरे पाठिंबा जाहीर करताना काय म्हणाले ?
आदरणीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे नक्की करतील असं म्हणत निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मी आज त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जायला पाहिजे, ते काम एकनाथ शिंदे व्यवस्थित करतील म्हणूनच मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाखाप्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल केली आहे. मी आपल्याच पक्षाच्या माणसाला भेटलो आहे. त्यात वेगळं काय करण्याचं काहीही कारण नाही असंही निहार ठाकरे यांनी सांगितलं.

१ जुलै रोजीच भेट झाली होती तरीही?
वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निहार ठाकरे आणि अंकिता पाटील (निहार यांच्या पत्नी) ज्या काँग्रेसच्या नेत्यादेखील आहेत, या तिघांची १ जुलै रोजीच म्हणजे शिंदेच्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशीच भेट झाली होती (खाली ट्विट पहा). ३० जूनच्या शपथविधीनंतर १ जुलै रोजी अंकिता यांनी त्यांच्यासोबतचा व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. मग आता पुन्हा केवळ शुभेच्छा साठी भेटले आणि हिंदुत्वावर बोलू लागले आहेत हे विशेष म्हणावे लागेल. आता अचानक कोणाच्याही ध्यानी-मणी नसलेले निहार ठाकरे थेट हिंदुत्वावर बोलू लागले आहेत, ज्यांच्या पत्नी अंकिता पाटील या सेक्युलर पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या सुद्धा आहेत. एकूण मागील संपूर्ण सिरीज पाहिल्यास एकनाथ शिंदे हे हेडलाईन मॅनेजमेंट करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. कालच्या शिवसेनेच्या जुन्या नेत्यांचा भेटी सुद्धा त्याचाच भाग होत्या असं म्हटलं जातंय. त्यानंतर ही आजची निहार ठाकरे भेटीची स्क्रिप्ट सुद्धा त्यांचीच असावी असं म्हटलं जातंय.

ठाकरे कुटुंब माझ्यासोबत असल्याचा पॉलिटिकल स्टंट?
भाजपाचे नेते आणि राज्यामधील माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह निहार ठाकरेंसोबत काही महिन्यांपूर्वी पार पडला होता. मुंबईमधील एका आलिशान हॉटेलमध्ये २८ डिसेंबर रोजी मोजक्या उपस्थितांच्या साक्षीने हा विवाहसोहळा पार पडणार होता.

अंकिता पाटील कोण आहेत :
अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून काम पाहतात. तसेच अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत. अंकिता यांचे वडील हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक नाव आहे. हर्षवर्धन यांनी २०१९ साली निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

निहार ठाकरे कोण?
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे हे निहार यांचे वडील. बिंदूमाधव यांचं १९९६ साली एका अपघातामध्ये निधन झालं. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे असणारे निहार हे मुंबईमधील एक प्रतिष्ठित वकील आहेत.

निहार ठाकरे यांच्या संबंधित जुना विवादित मुद्दा :
१५ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील डान्स बारविरोधी मोहिमेत नाट्यमय घडामोडीत निहार ठाकरे यांच्या मालकीच्या संगीत बार या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला होता. नाचण्याच्या नावाखाली (ज्यावर बंदी आहे) सुरू असलेल्या कुकृत्य कारवायांची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या मध्यरात्री म्हणजे साधारण साडेबारा वाजता छापा टाकण्यास आला होता.

अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली (पिटा) रमेश शेट्टी, हरीश शेट्टी आणि अर्जुन थापा या तिघांना अटक करण्यात आली होती आणि नऊ महिलांची सुटका करण्यात आली होती. सुटका करण्यात आलेल्या नऊ महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे माहिती समोर आली होती, त्यानंतर पोलिसांनी त्यांना माझगाव न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी निहार ठाकरे, अनु शेट्टी, जयराज शुक्ला आणि जगन्नाथ मिश्रा अशा शोध न लागलेल्यांविरोधात अनट्रेसेबल गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर चौधरी यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. जुनी बातमी येथे वाचू शकता Click Here

निहार ठाकरे हा बाळसाहेब ठाकरे यांचा थोरला मुलगा बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा असून १९९६ साली त्यांचे कार अपघातात निधन झाले. बिंदूमाधव चित्रपट निर्मितीत होते आणि अग्निपरीक्षा या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Neeraj Thackeray meet CM Eknath Shinde check details 29 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Neeraj Thackeray(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या