22 April 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | काय करतोय हा?, त्याने धावत्या मेट्रो ट्रेनचा दरवाजा हाताने उघडला, नंतर काय घडलं ते व्हायरल व्हिडिओत पहा

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या मेट्रोमधून दरवाजा उघडून उडी मारताना दिसत आहे. हे पाहून तुमच्या मनात विचार येऊ शकतो की, चालत्या मेट्रोतून कोणी दरवाजा का उघडेल. वास्तविक मेट्रोचे दरवाजे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्यावरच उघडतात, पण व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असं करताना स्पष्ट दिसत आहे. ती व्यक्ती आधी धावत्या मेट्रोचा दरवाजा बराच वेळ उघडण्याचा प्रयत्न करतो.

त्या व्यक्तीचं काय होतं :
काही वेळाने करताच तो त्यात यशस्वी होतो आणि मग कसलाही विचार न करता बाहेर उडी मारतो. यानंतर त्या व्यक्तीचं काय होतं ते अत्यंत भयानक असतं. हा व्हिडिओ पाहून बाकीचे लोकही असा मूर्खपणा करण्याआधी हजारवेळा विचार करतील. अवघ्या 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ती व्यक्ती दरवाजाजवळचं बटण दाबताना दिसत आहे, यादरम्यान तिथे उपस्थित असलेले लोक त्याला असं करण्यापासून रोखतात. मात्र, ती व्यक्ती इतरांकडे दुर्लक्ष करतो. मात्र बटण दाबून दरवाजा उघडत नसल्याने ती व्यक्ती अखेर आपल्या हातांनी दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच थेट बाहेर उडी मारतो आणि त्याचा मोठा अपघात होतो.

या चुकीचे परिणाम त्याला लगेच भोगावे लागले, हे तुम्ही पाहू शकता. मेट्रोतून उडी मारल्यानंतर तो माणूस तोंडावरच पडतो. इतकंच नाही तर तो ज्या धोकादायक पद्धतीने पडतो ते पाहता त्याच्या हाड-बरगडी तुटण्याची देखील शक्यता निर्माण होतं आहे. अनेकजण या व्यक्तीच्या या कृत्याला वेडेपणाचं म्हणत आहेत. लोकं म्हणत आहेत की, दर पाच मिनिटांनी मेट्रो एका स्टेशनवर थांबते, मग जीव धोक्यात घालण्याची त्याला का घाई झाली होती.

या प्रश्नांची उत्तरे ती व्यक्ती देऊ शकते :
आता या प्रश्नांची उत्तरे ती व्यक्ती स्वत:च देऊ शकते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @AwardsDarwin_ नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video man jumping from moving metro train viral video on social media check details 31 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या