23 November 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

धक्कादायक माहिती | मी मोदींना थेट भेटली, ईडी प्रकरणात मला कोर्टाची क्लिनचीट, ईडीचा विषय माझ्यासाठी संपला - भावना गवळी

MP Bhavana Gawali

MP Bhavna Gawali | २० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती आणि तसेच घडलं.

4 ऑगस्ट पर्यंत कोठडी :
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असं मत न्यायाधिशांनी मांडलं. वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून तर वकील अशोक मृंदरगी यांनी संजय राऊत यांच्याकडून बाजू मांडली.

ईडीच्या कचाट्यातील खा. भावना गवळींची धक्कादायक माहीती :
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देण्यासाठी गेले आहेत. मुंबईत भावना गवळी म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठं मनं केलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. हजारोच्या संख्येनं समर्थक सत्कार करणार आहेत. ईडी प्रकरणात मला कोर्टानं क्लिनचीट दिली. ईडीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भेटली. त्यांना माझी हकिकत सांगितली. कुठल्याही गोष्टीला क्लीनचीट देण्यासाठी कोर्ट आहे. ईडीची कारवाई विशिष्ट पद्धतीनं होत असते. संजय राऊत निर्दोष असतील कोर्टातं सिध्द करावं, मीही तेच केलं, असं भावना गवळी यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Bhavana Gawali statement over ED action check details 01 July 2022.

हॅशटॅग्स

#MP Bhavana Gawali(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x