22 November 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

Amazon Great Freedom Festival 2022 | अ‍ॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, गॅझेट्स अत्यंत स्वस्त

Amazon Great Freedom Festival 2022

Amazon Great Freedom Festival 2022 | कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२२ ची घोषणा केली आहे. हा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार असून १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉन दरवर्षी ऑगस्टमध्ये ग्रेट फ्रीडम सेल घेऊन येते. या सेलमध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणे स्मार्टफोनपासून रेफ्रिजरेटर्सपर्यंतच्या वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 2022 मध्ये कोणत्या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

तुम्हाला अनेक उत्तम ऑफर्स मिळतील :
* आयफोन १३ सीरिजबाबत ग्राहकांच्या खूप अपेक्षा आहेत. अॅपल आयफोन 14 सप्टेंबरमध्ये लाँच करणार असल्याने आयफोन 13 च्या किंमती या सेलमध्ये घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहक हा फोन मूळ किंमतीच्या जवळपास निम्म्या किंमतीत खरेदी करू शकतात.
* अॅमेझॉनने यावर्षी एसबीआय कार्डसोबत पार्टनरशिप केली असून, त्याअंतर्गत ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
* अॅमेझॉनवर पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या दरम्यान लॅपटॉप, होम अप्लायन्सेस, गेमिंग अॅक्सेसरीज, स्मार्ट स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर ऑफर्स उपलब्ध असतील.
* या ऑफर्सची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर या ऑफर्स उपलब्ध होणार असल्याची खात्री पटली आहे. अॅमेझॉनच्या प्रमोशनल पेजनुसार, याच्या इको डिव्हाईसवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते, तर किंडलला 3,400 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
* अॅमेझॉनच्या फायर टीव्ही डिव्हाईसवर 44 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. लॅपटॉप कॅटेगरीमध्ये खरेदीदारांना काही नोटबुकवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट :
स्मार्टफोनवरील ऑफर्स पूर्वीसारख्या उत्साहवर्धक नसल्या, तरी यंदा गोष्टी बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅमेझॉनच्या प्रमोशन पेजवर स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. सोनी, सेनहाइजर, बोस यांसारख्या ब्रँडचे टॉप-क्वालिटी हेडफोन्स या सेलदरम्यान सहसा सवलतीत दिले जातात, त्यामुळे या ऑफर्सवर लक्ष ठेवा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये महागड्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर दरवर्षी उत्तमोत्तम ऑफर्स इथे दिल्या जातात. देशात अॅमेझॉनची स्पर्धा ई-कॉमर्स वेबसाइट- फ्लिपकार्टशी आहे. फ्लिपकार्ट आपला सुपर सेव्हिंग डेज सेल 6 ऑगस्टपासून सुरू करणार असल्याची माहिती आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amazon Great Freedom Festival 2022 will from 6 August check details 02 August 2022.

हॅशटॅग्स

#Amazon Great Freedom Festival 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x