24 November 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Nippon Mutual Fund | तुम्ही या म्युच्युअल फंडाच्या 1000 रुपयांच्या SIP ने 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवाल समजून घ्या

Nippon Mutual Fund Investments

Nippon Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूक देखील त्यांच्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवतात. विश्वास बसत नसेल तर लेखात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. म्युच्युअल फंडाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही दर महिन्याला एक छोटी रक्कम गुंतवणूक करू शकता. या प्रकारच्या गुंतवणुकीच्या पद्धतीला म्युच्युअल फंडांमध्ये SIP म्हणतात. महिन्याला किमान 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तरी या म्युच्युअल फंड योजनेमुळे गुंतवणूकदार करोडपती बनू शकतात. प्रथम जाणून घ्या ही कोणती म्युच्युअल फंड योजना आहे जी आपल्याला करोडपती बनवू शकते.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
या म्युचुअल फंडने गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक आणि SIP च्या माध्यमातून लक्षाधीश बनवले आहे. या म्युच्युअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू 4 मार्च 2022 रोजी 1891.53 रुपये नोंदवण्यात आली होती. या म्युच्युअल फंड योजनेची एकूण मालमत्ता 12045.05 कोटी रुपये आहे. म्हणजेच, निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेवर अनेक लोकांचा विश्वास आहे, आणि त्यातून खूप चांगले परतावे मिळाले आहेत.

गुंतवणूक किती वेगाने वाढली :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेची सुरुवात 8 ऑक्टोबर 1995 रोजी करण्यात आली. त्यावेळी जर तुम्ही निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आता 1.89 कोटी रुपये झाले असते. 50,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तरी त्याचे मूल्य सुमारे 1 कोटी रुपये झाले असते. या योजनेने वर्षानुवर्षे चांगला परतावा कसा दिला आपण जाणून घेऊ.

वार्षिक परतावा :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने मागील 1 वर्षात 10000 रुपयाच्या गुंतवणूकीवर 11642.20 परतावा दिला आहे. यात गुंतवणूकदारांना 16.42 टक्के परतावा मिळाला आहे. या योजनेने मागील 2 वर्षांत 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 16210.00 रुपयांपर्यंत परतावा दिला आहे. अशा प्रकारे, येथे गुंतवणूकदारांना मिळालेला एकूण परतावा 62.10 टक्के आहे. आणि वार्षिक परतावा 27.32 टक्के मिळाला आहे.

103.92 टक्के परतावा :
या योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 18025.50 रुपये परतावा दिला आहे. यात गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्याचे प्रमाण 80.25 टक्के आहे. दुसरीकडे, गुंतवणूकदारांना मिळालेला वार्षिक परतावा 21.61 टक्के आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने मागील 5 वर्षांत 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20392.40 रुपये परतावा दिला आहे. या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 103.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सरासरी वार्षिक परतावा दर 15.30 टक्के आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने मागील 10 वर्षांत एकरकमी 10000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 43775.90 रुपयांपर्यंत परतावा दिला आहे. यात गुंतवणूकदारांना 337.76 टक्के परतावा मिळाला आहे. या योजनेत सरासरी वार्षिक परतावा दर 15.89 टक्के आहे. दुसरीकडे, जर तुम्ही निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेच्या सुरुवातीला 10000 रुपयेची SIP गुंतवणूक केली असती तर ती आज वाढवून 1891534.60 रुपये झाली असती. यात गुंतवणूकदारांना 18815.35 टक्के परतावा मिळाला आहे. या योजनेचा सरासरी वार्षिक परतावा दर 21.95 टक्के आहे.

1000 रुपयांच्या SIP ने 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवाल?
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेने एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत लॉन्च झाल्याच्या वेळी महिन्याला 1000 रुपयेची SIP सुरू केली असती, तर त्याच्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 1 कोटी रुपयाहून अधिक झाले आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत, लॉन्चच्या वेळी जर तुम्ही 1000 रुपयेची SIP सुरू केली असती, तर आत्तापर्यंत तुम्हाला 316000 रुपये बचत झाली असती. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 11920369 रुपये झाले आहे. टक्केवारीत पाहिल्यास तुम्हाला गुंतवणुकीवर 3672.27 टक्के परतावा मिळाला असता. वार्षिक सरासरी परतावा 22.27 या दराने मिळाला असता.

म्युच्युअल फंड SIP म्हणजे काय?
म्युच्युअल फंडातील पद्धतशीर गुंतवणूक योजनेला थोडक्यात एसआयपी म्हणतात. ही एक मासिक गुंतवणूक पद्धत आहे. ही गुंतवणूक बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मासिक अवर्ती ठेव योजना सारखी असते. पण त्यात आणखी अनेक वैशिष्ट्ये आणि लाभ देखील आहेत. यामध्ये गुंतवणूक वाढवता किंवा कमी करता येते. आणि त्याचा कालावधीही तुम्ही ठरवू शकता. याशिवाय SIP द्वारे दीर्घकाळ गुंतवणुकीवर परतावा ही जबरदस्त मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nippon Mutual Fund investments for long term benefits on 06 April 2023.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x