23 November 2024 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

LIC Mutual Fund | एक नंबर मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, या फंडातील गुंतवणुक तुमचा पैसा वेगाने वाढवेल

LIC mutual fund

LIC Mutual Fund | LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी गुंतवणूक क्षेत्रात देखील अग्रेसर आहे. LIC म्युचुअल फंडच्या अनेक योजना राबवते आणि त्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. काही योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना 5 वर्षात दुप्पट परतावा मिळाला आहे.

LIC म्युच्युअल फंड सर्वोत्तम योजना:
सरकारी विमा कंपनी LIC चा देखील म्युच्युअल फंड व्यवसाय आहे. LIC कंपनी आपला म्युचुअल फंड व्यवसाय तिची उपकंपनी LIC म्युच्युअल फंड द्वारे चालवते. LIC MF च्या अनेक योजना बाजारात सुरू आहेत ज्या सर्व गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. काही योजनांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना 5 वर्षात दुप्पट परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 5 वर्षांच्या रिटर्न चार्टवर नजर टाकली तर, LIC MF च्या टॉप 5 योजनानी 17 ते 19 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. बँकेच्या मुदत ठेवींच्या तुलनेत LIC म्युच्युअल फंड ने तिप्पट परतावा दिला आहे. आपण ह्या लेखात LIC च्या सर्वोत्कृष्ट 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती घेणार आहोत.

LIC लार्ज आणि मिड कॅप फंड :
LIC लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंडाने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 19.05 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. तर किमान 1000 रुपयांची SIP केली जाऊ शकते. 30 नोव्हेंबर 2021 रोजी या म्युचुअल फंडची मालमत्ता 1,501 कोटी रुपये होती आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी खर्चाचे प्रमाण 0.85 टक्के होते. या योजनेने मागील 5 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.39 लाख रुपये परतावा दिला आहे. तर, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य आता 10.03 लाख रुपये झाले आहे.

LIC एक्सचेंज ट्रेडेड म्युचुअल फंड-सेन्सेक्स :
LIC एक्सचेंज ट्रेडेड म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 18.14 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत एकरकमी किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंड ची एकूण मालमत्ता 523 कोटी रुपये होती आणि 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.10 टक्के होते. मागील 5 वर्षात या योजनेने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.30 लाख रुपये परतावा दिला आहे. तर, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य आता 9.51 लाख रुपये झाले आहे.

LIC एक्सचेंज ट्रेडेड म्युच्युअल फंड-निफ्टी 50 :
निफ्टी 50 मधील LIC च्या या एक्सचेंज ट्रेडेड म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 17.39 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत एकरकमी किमान गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या फंडाची मालमत्ता 625 कोटी रुपये होती आणि 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.10 टक्के होते. या योजनेत मागील 5 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.23 लाख रुपये परतावा मिळाला आहे. तर, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य आता 9.42 लाख रुपये झाले आहे.

LIC म्युच्युअल फंड इंडेक्स-सेन्सेक्स योजना :
LIC म्युच्युअल फंड इंडेक्स-सेन्सेक्स योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 17.31 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. तर किमान 1000 रुपयांची SIP केली जाऊ शकते. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या फंडाची मालमत्ता 42 कोटी रुपये होती आणि 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.37 टक्के होते. या योजनेत मागील 5 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.22 लाख परतावा मिळाला आहे. तर, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य 9.38 लाख रुपये झाले आहे.

LIC लार्ज कॅप म्युच्युअल फंड :
LIC लार्ज कॅप म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 16.94 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपये आहे. किमान 5000 रुपये पासून तुम्ही ह्या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत किमान 1000 रुपयांची SIP गुंतवणूक केली जाऊ शकते. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या म्युच्युअल फंड ची मालमत्ता 628 कोटी रुपये होती आणि 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांच्या खर्चाचे प्रमाण 1.31 टक्के होते. या योजनेत मागील 5 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 2.19 लाख झाले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना 2.19 लाख परतावा मिळाला आहे. तर, 10,000 रुपये मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य 9.41 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC mutual fund schemes for high return on investment on 3 August 2022.

हॅशटॅग्स

#LIC Mutual Funds(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x