PPF Calculator | 1 कोटी रुपये परतावा मिळविण्यासाठी PPF खात्यात महिना किती रक्कम जमा करावी?, तुमच्या फायद्याचं गणित जाणून घ्या

PPF Calculator | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक प्रकारची लहान बचत योजना आहे जी सरकार द्वारे संचालित केली जाते. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना पैसे बुडण्याचा कोणताही धोका नसतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. निवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. यामध्ये खूप मोठा फायदा मिळत नाही, पण त्यातून मिळणा जेरे उत्पन्न असते ते करमुक्त असते. तसेच, त्यावर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलतही मिळते. त्यावर मिळणारा व्याज परतावा आयकराच्या कलमानुसार करमुक्त आहे.
बचत योजनांच्या तुलनेत जास्त व्याज परतावा :
पीपीएफ खात्यावर मिळणारा व्याज परतावा हा इतर बचत योजनांच्या तुलनेत जास्त असतो. PPF वर इतर योजनांप्रमाणेच हमी परतावा मिळतो. तुम्हाला PPF मध्ये गुंतवणुकीसाठी दोन पर्याय दिले जातात ज्यात तुम्ही गुंतवणूक एकरकमी किंवा 12 समान हप्त्यांमध्ये करू शकता. यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करता येत आणि कमाल 1.5 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या, PPF योजनेत 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. आणि योजनेचा कमाल कालावधी 15 वर्षांचा आहे. जर तुम्ही नियमितपणे पीपीएफ खात्यात गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला निवृत्तीनंतर एक कोटी रुपये परतावा देखील मिळू शकतो.
1 कोटी रुपये परतावा मिळविण्यासाठी :
पीपीएफ खात्यातून 1 कोटी रुपये परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला 25 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतील आणि त्यावर तुम्हाला 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मोजून ही रक्कम परत दिली जाईल. जर असे गृहीत धरले की तुम्ही 25 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये पीपीएफ खात्यात गुंतवले, तर त्यावर सध्याच्या चक्रवाढ व्याजदरानुसार तुम्हाला 1 कोटी रुपये परतावा मिळेल. यावर चक्रवाढ व्याज दीर्घ कालावधीसाठी मिळते. त्यामुळे ही रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत वाढते.
पीपीएफमध्ये जितका जास्त वेळ गुंतवणुक केली जाते तितका जास्त परतावा मिळतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले, तर अंतिम चक्रवाढ व्याजदरानुसार तुम्हाला 66.60 लाख रुपये व्याज परतावा मिळेल. त्यापुढे गुंतवणुकीचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी वाढवला तर PPF मधील जमा रक्कम 1 कोटी रुपये होईल.
पीपीएफ खाते अधिक काळ वाढवण्याचे नियम :
PPF खात्याचा मॅच्युरिटी कालावधी कमाल 15 वर्षे असतो पण ते आणखी वाढवता येते. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज भरावा लागेल. ज्यामध्ये गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो. दर पाच वर्षांच्या कालावधीसाठी, तुम्ही PPF ची मुदत वाढवू शकता.
PPF मधून मिळणारे कर लाभ :
EEE श्रेणी अंतर्गत PPF खात्यावर देखील कर सवलत उपलब्ध आहे. ज्यामध्ये आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो. एवढेच नाही तर पीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेली रक्कम या दोन्ही वर कोणताही कर आकारला जात नाही म्हणंजे तुमची गुंतवणूक रक्कम आणि परतावा करमुक्त आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PPF Calculator investment benefits and huge return on long term investment on 4 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL