19 April 2025 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

हर घर महंगाई | ज्या महागाई - बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे मोदी सरकार सत्तेत, तेच मुद्दे 2024 भाजपाला भोवणार?

Congress Protest against Inflation

Congress Protest against Inflation | काँग्रेसने महागाई विरोधात देशभरात आंदोलन सुरूच ठेवले आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात ठाण मांडून बसले आहेत. खरंतर राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांना घेऊन संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढत होते. पण पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवलं आणि राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी काँग्रेसला मोर्चा काढू दिला नाही. या भागात कलम १४४ लागू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यालयातून मोर्चा काढणाऱ्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं.

खासदारांना मारहाण: राहुल गांधी .
या दरम्यान राहुल गांधी म्हणाले, सर्व खासदार राष्ट्रपती भवनात जाऊन दरवाढीचा मुद्दा उपस्थित करत होते. पण आम्हाला आणखी पुढे जाऊ दिलं जात नाहीये. आमचे काम जनतेचे प्रश्न मांडणे हे आहे. काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. काहींवर प्राणघातक हल्लाही करण्यात आला.

केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली.

विरोधकांच्या मागे ईडीची चौकशी केली जात आहे:
‘देशातील स्वायत्त संस्थांच्या ताकदीविरोधात विरोधी पक्ष लढत आहेत. पण आज सरकारने आपली जनता या सर्व संस्थांवर ठेवली आहे. प्रत्येक संघटनेत आरएसएसची माणसे असतात. आमचे सरकार कधी होते. तेव्हा आम्ही त्यावर नियंत्रण ठेवत नव्हतो. त्यामुळे आज कोणी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर त्याच्या विरोधात ईडी, इतर चौकशी लावली जाते म्हणून विरोधक उभे आहेत. पण हवा तितका प्रभाव पाडू शकत नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Congress Protest against Inflation check details 05 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress Protest against Inflation(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या