23 November 2024 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

ELSS Funds | 10 ELSS फंड जॅकपॉट परतावा देत आहेत, जबरदस्त नफा तर मिळतो आहेच सोबत कर सवलतही

ELSS Funds

ELSS Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने तुम्हाला केवळ कर सवलत नाही, तर दीर्घकाळात मोठा परतावाही मिळतो. एकदा जर का गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर दीर्घकाळात त्याचा जबरदस्त परतावा येईल हे नक्की.

एकदा जर ला तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला की, तुम्हाला या योजनेत जबरदस्त आर्थिक लाभ मिळतात. त्या साठी तुम्हाला आधी काही गोष्टींचा विचार करावा लागेल जसे की, निश्चित उत्पन्न, इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंड. आणि कोणत्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करायची ह्याचा देखील तुम्हाला विचार करावा लागेल. तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, गुंतवणुकीची क्षमता आणि जोखीम घेण्याची क्षमता याबद्दल सल्लामसलत केली पाहिजे.

जर तुमचे गुंतवणूक उद्दिष्ट लहान असेल , किंवा कमी कालावधी साठी असेल तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी तुमच्या उदिष्टांशी सुसंगत असा म्युचुअल फंड निवडावा लागेल. त्यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. जसे कि काही महिन्यांसाठी उत्पन्नातील काही वाटा वेगळा ठेवा, बचत करा, नियमित उत्पन्न निर्माण करण्याचा विचार करा, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करा.

गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंड निवडण्याचा निर्णय घेताना खाली दिलेल्या बाबी तपासून पहा :
तुमचे गुंतवणुकीचे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्यास इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंड तुमच्या साठी आदर्श गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही सेवानिवृत्तीचे नियोजन करू शकता. आणि तुम्ही जर थोडी जोखीम धोका पत्करण्यास तयार असाल तर म्युचुअल फंड एक चांगली गुंतवणूक ठरू शकते. जर तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट अल्पकालीन असल्यास तर त्या साठी लहान बचत योजना उपलब्ध आहेत. आणि त्यात तुम्ही पैसे बचत करून चांगला व्याज मिळवू शकता. गुंतवणुकीच्या फंडाचा प्रकार ठरवल्यानंतर, एएमसीची विशिष्ट योजना ठरवावी लागेल. हे निर्णय सामान्यतः AMC चा ट्रॅक रेकॉर्ड, योजनेची योग्यता, पोर्टफोलिओ तपशील इत्यादीच्या आधारे घेतले जातात.

 1 वर्षात सर्वाधिक परतावा देणारे ELSS फंड :
* क्वांट टॅक्स प्लॅन फंड : या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 59.00 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* BOI AXA टॅक्स अॅडव्हांटेज फंड : या फंडाने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 31.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर फंड : या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 26.80 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* आयडीएफसी टॅक्स अॅडव्हांटेज फंड : या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 40.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड : फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 24.70 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* डीएसपी टॅक्स सेव्हर फंड : मागील एका वर्षात या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 29.30 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* जेएम टॅक्स गेन फंड : या फंदा ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 23.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* PGIM India ELSS टॅक्स सेव्हर फंड : या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 32.90 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* कोटक टॅक्स सेव्हर फंड : या म्युचुअल फंडाने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
* UTI लाँग टर्म इक्विटी फंड : या म्युचुअल फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 26.00 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top ten ELSS Funds for long term investment and high returns on 6 August 2022.

हॅशटॅग्स

ELSS Funds(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x