22 November 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Shinde Vs BJP | भाजप नेत्याने शिंदे गटाच्या प्रवक्त्याची लायकी काढली, थेट ड्रायव्हर पदासाठी अर्ज करण्याची ऑफर

Shinde Vs BJP

Shinde Vs BJP | शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर थेट आरोप केले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची नाहक बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.

निलेश राणे यांचे ट्विट :
नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे!”, असं ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर शाब्दिक हल्ला केलाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुद्धा इशारा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि नव्या निर्णयांमुळे राज्यातील जनता खुश आहे. दीपक केसरकरांनी उगाच भाजप नेत्यांनी काय करावं, असे सल्ले देऊ नये. मुख्यमंत्री साहेबांनी दीपक केसरकरांना आवरावं, अशी विनंती भाजप नेते राजन तेली यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजन तेली हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

केसरकर अजून काय म्हणाले होते :
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी विकासाच्या मुद्द्यावर एकमत करायला मी कधीही तयार आहे. मात्र नारायण राणे, त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळले पाहिजे. राणे यांच्याकडे रोजगार निर्माण करणारे मंत्रालय आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Vs BJP leader Nilesh Rane offer Deepak Kesarkar driver post check details 07 August 2022.

हॅशटॅग्स

#Shinde Vs BJP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x