22 November 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | 3342 टक्के परतावा देणारा हा स्टॉक अजून तेजीत येण्याचे संकेत, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | एडलवाईस ब्रोकिंग लिमिटेडने केपीआर मिल्सच्या स्टॉकवर ‘बाय'(खरेदी) टॅग दिला आहे. तज्ञांनी ह्या स्टॉक ची पुढील लक्ष्य किंमत 860 रुपये राहील, असा अंदाज वर्तवला आहे. शेअरच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारावर हा शेअर आणखी पुढे 52.34 टक्के परतावा देऊ शकतो.

खरेदी करण्याचा सल्ला: तज्ञ KPR मिल लिमिटेड स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. आणि स्टॉक खरेदीची शिफारस करत आहेत. केपीआर मिल्स लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी NSE निर्देशांकावर प्रति शेअर 564.50 रुपयेवर ट्रेड करत होता. मागील काही ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत स्टॉक मध्ये 0.0089 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या किंमतीवर, स्टॉक त्याच्या 52आठवड्याच्या उच्चांक पातळीपेक्षा 26.59 टक्के खाली ट्रेड करत आहे. आणि 52आठवड्याच्या नीचांकी पातळीपेक्षा 70.94 टक्के वर ट्रेड करत आहे. 14 जानेवारी 2022 रोजी हा स्टॉक 769.00 रुपयेच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. आणि 23 ऑगस्ट 2021 रोजी ते 330.23 रुपये आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किमतीवर पोहोचले होते.

पुढील लक्ष्य किंमत :
एडलवाईस ब्रोकिंग लिमिटेड ने KPR मिल्सच्या स्टॉकवर 860 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह ‘बाय'(खरेदी) रेटिंग दिली आहे. शेअरच्या सध्याच्या बाजारभावाच्या आधारे पुढील काळात हा शेअर 52.34 टक्के परतावा देऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. NSE वर या स्टॉकने आता पर्यंत 3,342.07 टक्के परतावा दिला आहे. 31 ऑगस्ट 2007 रोजी स्टॉकची किंमत 16.40 रुपये होती, ती आता 564.50 रुपयेवर पोहोचली आहे. त्याच वेळी, मागील पाच वर्षांत ह्या स्टॉकमध्ये 268.71 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 47.04 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आणि मागील एका महिन्यात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 11.12 टक्के परतावा दिला आहे. मात्र, या शेअरमध्ये सरासरी दर वार्षिक वाढ शून्य आहे.

बाजार तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्मने जाहीर केले आहे की “केपीआर मिलचा महसूल वार्षिक 75.4 टक्के आणि प्रती तिमाही 9 टक्के वाढून 1,585 कोटी रुपयांवर गेला आहे. ही महसूल वाढ क्षेत्रातील मजबूत व्यापार वाढीमुळे आणि वाढत्या मागणीमुळे दिसत आहे. कापड क्षेत्रातील महसूल 63 टक्के वाढून 1,276 कोटी रुपये झाला आहे. तर साखर क्षेत्रातील महसूलात 2.5 पट वाढ झाली असून 284 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. टेक्सटाइल्समध्ये, गारमेंटने वार्षिक 83 टक्के वाढ दर्शवली आहे आणि एकूण 692 कोटी रुपयांची वाढ जाहली आहे. यार्न आणि फॅब्रिक सेगमेंटमध्ये तुलनेने कमी वाढ झाली आहे. 42 टक्के सरासरी वर्षिक परतावासह 541 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. कापसाच्या किमती आणि मालवाहतुकीच्या खर्चामुळे एकूण मार्जिन 40 bps दर तिमाहीत 40.5.टक्के पर्यंत घसरला आहे. ऑपरेटिंग खर्चावरील कडक नियंत्रणामुळे EBITDA मध्ये 15 टक्के घट पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे, EBITDA मार्जिन अनुक्रमे 23.2 टक्के वर सपाट होता. एडलवाईस ब्रोकिंग लिमिटेड ने म्हंटले आहे की आम्हाला अपेक्षा आहे की गारमेंट सेग्‍मेंट त्‍याची उत्‍कृष्‍ट कामगिरी करेल आणि आर्थिक वर्ष 2022-2024 मध्‍ये 14 टक्के वाढ प्रदान करेल. यामुळे शेअर्स ची किंमत जबरदस्त वाढण्याची शक्यता आहे.

कंपनीबद्दल सविस्तर :
केपीआर मिल्स लिमिटेड ही कापड उद्योगातील एक माध्यम भांडवल कंपनी असून तिचे बाजार भांडवल 19,309.07 कोटी रुपये आहे. कंपनी वैविध्यपूर्ण व्यवसायात सक्रिय आहे. अशा व्यवसायात पांढरी क्रिस्टल साखर, धागा, फॅब्रिक आणि वस्त्रे यांचा समावेश होतो. कंपनी कॉम्पॅक्ट, मेलेंज, कार्डेड, पॉलिस्टर आणि कॉम्बेड यार्न, रेडीमेड कापड, फॅब्रिक्स आणि रेडिमेड विणलेले कापड यासह इतर कापड उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks KPR mills share price return on 8 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x