प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप | भाजप नेते दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप, व्हिडिओ पहा
Inflation in India | महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था यावर मोदी सरकार पूर्णपणे नापास झालं आहे हे सर्व देशाला आता कळून चुकलं आहे. परिणामी ‘हर घर महंगाई’ भाजपचा २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील मार्ग खडतर असल्याने भाजपमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत. त्यामुळे देशभरातील विरोधकांवर मोठ्या प्रमाणात ईडी – सीबीआयचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच २०२४ मध्ये सामान्य लोकांना महागाई, बेरोजगारी ते ढासळलेली अर्थव्यवस्था या गंभीर मुद्यांवरून परावृत्त करण्यासाठी काही नेत्यांवर धामिर्क मुद्यांना हवा देण्याची जवाबदारी देण्यात आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. टीव्ही वृत्त वाहिन्यांवर धार्मिक मुद्दे कसे प्रकाशझोतात राहतील याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.
दरेकरांच्या उन्मत्त प्रतिक्रियेवर महिलांकडून शिव्या श्राप :
दरम्यान, तसेच पत्रकारांनी भाजप नेत्यांना पत्रकार परिषदेत महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारल्यास भाजपचे नेते एकतर काढता पाय घेतात, विषयाला बगल देतात किंवा त्यावर अत्यंत उर्मट, उन्मत्त आणि संतापजनक प्रतिक्रिया देतात. सध्या या प्रतिक्रिया रक्त खवळेल अशा स्थितीत जाणून पोहोचल्या आहेत. तसाच एक प्रकार आज घडला आहे. भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांना पत्रकार परिषदेत देश आणि राज्यातील महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रविण दरेकर यांनी ‘प्रचंड महागाई, बेरोजगारीवर जनता मोदींवर खूप’ अशी अत्यंत उन्मत्त प्रतिक्रिया दिली. त्यावर आता अत्यंत कडक भाषेत भाजपवर ऑनरेकॉर्ड टीका सुरु झाली आहे. ‘लोकमत वृत्तपत्राने’ दरेकरांच्या या विधानावर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर लोकांनी यावर अत्यंत कडक भाषेत प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यात अनेक महिला महागाईमुळे संतप्त झाल्याचं पाहायला मिळत असून भाजपाला निवडणुकीत हाकलून देण्याचं भाष्य त्या करत आहेत.
संसदेचे अधिवेशन सुरू होऊन १८ दिवस उलटल्यानंतर चर्चेच्या पटलावर महागाईचा विषय घेतला गेला. वास्तविक महागाई, बेरोजगारी हे आजचे खरे राष्ट्रीय आपत्तीचे प्रश्न आहेत. पण त्यावर पुरेशा गंभीरपणे सदनात चर्चा न होणे हेच फार चिंताजनक आहे. देश महागाईत होरपळून निघत असताना केंद्र सरकारने या विषयाची अग्रक्रमाने चर्चा करण्यापेक्षा तो टाळण्याकडे, विलंबाने घेण्याबद्दल जे राजकारण केलं ते अतिशय हीन दर्जाचे आहे. म्हणूनच विरोधकांनी २ ऑगस्ट २०२२ रोजी बेरोजगारी, महागाई, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया आणि देशाची अर्थव्यवस्था यावर केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राज्यसभेत केली ती नजरेआड करून चालणार नाही. त्यांची मागणी धुडकावल्याने हे प्रश्न सुटणार नाहीत हे उघड सत्य आहे.
प्रचंड महागाईने देशाचा सर्वसामान्य नागरिक त्रस्त :
प्रचंड महागाईने देशाचा सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळत आहे. जे मिळते त्या उत्पन्नात घर तरी कसे चालवायचे ? या विचाराने माता भगिनी आणि बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेली लाखो तरुणांचे अश्रू सरकारला दिसत नाहीत काय ? मुळात देशात महागाई आहे हेच मोदी सरकारला मान्य नाही असे दिसते’, असा हल्लाबोल विरोधकांनी केला. तर काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल यांनी, २०१४ च्या तुलनेत आज महागाईचा आलेख जीवनाशक वस्तूंसह सर्व बाबतीत फारच वाढलेला आहे हे आकडेवारीने सिद्ध केले.
रुपया जेव्हा घसरतो तेव्हा साऱ्या देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळते :
गुजरातचे मुख्यमंत्री असताना विद्यमान पंतप्रधान मोदी म्हणायचे ‘रुपया जेव्हा घसरतो तेव्हा साऱ्या देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळते. महागाई हे दिल्लीचे पाप आहे’, याचीही आठवण त्यांनी करून दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आदींनी विरोधकांचे मत खोडून काढण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न केला. पण, महागाई आहे हे मान्य करून सरकार ती कमी करण्याचा प्रयत्न करेल असे अर्थमंत्री म्हणाल्या. सरकारने पक्षीय राजकारण सोडून देऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेवर खरेच श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. म्हणजे २०१४ नंतरच नवा सक्षम भारत निर्माण झाला असे जे म्हणतात त्यांना वास्तव कळेल.
अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले :
वास्तविक गेल्या आठ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच. ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले होते. पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध, भाजीपाला, औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया घसरतो आहे आणि भारतीय पातळीवरही महागाईने रुपया कवडीमोल होतो आहे. अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, दरवर्षी दोन कोटी रोजगार, नोटबंदीने काळापैसा खतम वगैरे भोंगळ, भ्रामक, मनमानी, अशास्त्रीय भाषण बाजीचे पिळत आता पुन्हा पुन्हा उघडे पडत आहे. पण यात करोडो सर्वसामान्य भरडले जात आहेत. आणि हो निवडणुकीसाठी जी ८०/२० ची धर्मांध, घटनाद्रोही मांडणी करणाऱ्यांनी यात ऐंशी टक्केवालेही भरडले जात आहेत हे लक्षात घ्यावे.
आठ वर्षात सरासरी दुप्पट महागाई झाली :
अवघ्या आठ वर्षात सरासरी दुप्पट महागाई झाली आहे. विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात व महागाई विरोधात आक्रोश करते आहे. पण सरकार त्याबाबत ब्र ही काढत नाही. समाज माध्यमातूनही त्याबाबत जाब विचारणे सुरू आहे पण समाज माध्यमांच्या जीवावरच निवडून आलेल्या सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. या सरकारने गेल्या आठ वर्षात सरासरी दर सहा महिन्यांनी म्हणजे तेरा वेळा अबकारी करात वाढ केली आहे. इंधनावर अवाजवी कर लादून लाखो कोटी रुपये सामान्यांकडून लुटले आहेत. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर न बोलणे हा बदल सत्तापिपासा कशी व किती विचारभ्रष्ट करते याचे उदाहरण आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही यामुळे अंधभक्तही याबाबत स्वतःशी चरफडत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BJP MLA Praveen Darekar reply on question over inflation and unemployment check details 08 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार