22 November 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

राऊतांना उत्तर देण्यासाठी महिला आमदारांचा भावनिक वापर, तर समर्थक अपक्षांचा राजकीय आकडेवारीसाठी शिंदेंकडून वापर?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.

या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही इश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. त्यानंतर विजय कुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे संकटमोचक आणि फडणवीस यांचे खास असलेले गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. सहाव्या क्रमांकावर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर दादा भुसे यांनी शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना संधी नाही :
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट-भाजप सरकारला अनेक अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं जाईल, अशी चर्चा होती. शिंदे गटातील बच्चू कडूंची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असंही म्हटलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांना सध्या वेटिंगवर ठेवलं आहे.

शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला वंचित :
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तीन महिला आमदार शिंदे गटात सहभागी झालेल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपतही महिला आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या महिला आमदारांना संधी दिली याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र, शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये महिला वंचित राहिल्या आहेत.

शिंदेंकडून मूळ राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रथम न्याय :
सावंतवाडी नगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून केसरकर यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले. मूळचे राष्ट्रवादीच्या गोटातील असलेलं तत्कालीन आमदार दीपक केसरकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. सावंतवाडी मतदारसंघातून तीन वेळा निवडून येण्याची हॅट्रिक त्यांनी साधली आहे. सेना-भाजप युती सरकारमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. तसेच २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे उदय सामंत यांना पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपद देऊन जुन्या शिवसैनिक आमदारांना नारळ दिला आहे.

त्यामुळे बंड पुकारल्यापासून राष्ट्रवादीवर निशाणा साधणारे आणि राष्ट्रवादीला कारणीभूत ठरवणारे एकनाथ शिंदे यांचा राजकीय चेहरा उघडा पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. वरून शिंदेंना समाज माध्यमांवर देखील प्रचंड टीकेचा सामना करावा लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra CM Eknath Shinde made cabinet expansion check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x