22 November 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

2022 Honda CB300F | 2022 होंडा CB300F भारतात लाँच, किंमत आणि जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

2022 Honda CB300F

2022 Honda CB300F | होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आपली प्रीमियम उपकंपनी होंडा बिगविंग इंडिया अंतर्गत देशात ३०० सीसीची नवीन बाइक लाँच केली आहे. नवी होंडा सीबी ३०० एफ ही कंपनी दिल्लीत २.२६ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आली आहे. यासाठी आता बुकिंगही सुरू झालं आहे, तर त्याची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. होंडा सीबी३०० एफच्या वेरिएंटनिहाय किमतींची माहिती आम्ही येथे दिली आहे.

व्हेरियंटनुसार किंमती :
CB300F डीलक्स – 2.26 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)
CB300F डीलक्स प्रो – 2.29 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली)

नवीन होंडा सीबी ३०० एफ डिलक्स आणि डिलक्स प्रो या दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. डिलक्स व्हेरिएंटची किंमत 2.26 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर हाय-स्पेक डिलक्स प्रोची किंमत 2.29 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. कंपनी ही बाईक तीन कलर स्कीममध्ये देत आहे, मॅट ऍक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड.

इंजिन स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :
नव्या होंडा सीबी ३०० एफमध्ये २९३ सीसी, सिंगल सिलिंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. ही मोटर 24 बीएचपीची पॉवर जनरेट करते आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर नव्या सीबी३०० एफमध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच, होंडाची सिलेक्टेबल ट्रॅक्शन कंट्रोल (एचएसटीसी) सिस्टिम, होंडाची स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टिम (एचएसव्हीसीएस), ऑल एलईडी लाइटिंग सिस्टिम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

या बाईक्सशी स्पर्धा करतील :
नवीन होंडा सीबी ३०० एफ मध्ये गोल्डन यूएसडी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ५-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक शोषक मिळते. ब्रेकिंग ड्युटीसाठी बाइकमध्ये फ्रंटला 276 एमएम डिस्क ब्रेक आणि रियरला 220 एमएम डिस्क असून ड्युअल-चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे. नवीन होंडा सीबी ३०० एफ बीएमडब्ल्यू जी ३१० आर, केटीएम ड्यूक २५०, बजाज डोमिनार ४०० सारख्या स्पर्धा करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 2022 Honda CB300F launched in India check details 09 August 2022.

हॅशटॅग्स

#2022 Honda CB300F(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x