19 April 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Multibagger Penny Stocks | असे स्टॉक निवडा, छप्परफाड परतावा, या 2 रुपये 81 पैशाच्या शेअरने 1 लाखाचे तब्बल 1.86 कोटी केले

Multibagger penny stocks

Multibagger Penny Stocks | आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा जबरदस्त कंपनीच्या शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना इतका जबरदस्त परतावा दिला की ते करोडपती बनले आहेत. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत 18,569 टक्के चा भरघोस परतावा दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न :
तुम्ही देखील थोडेफार पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून करोडपती बनू शकता,फक्त तुमच्याकडे संयम हा गुण असला पाहिजे. अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे, जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. ते असे मानतात की गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीच्या मूलभूत नियमाचे पालन इमानदारीने केले पाहिज. ते म्हणजे ‘शेअर खरेदी करा आणि दीर्घकाळ होल्ड करून ठेवा’. आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरचे नाव आहे – मॅरिको लिमिटेड. ही FMCG क्षेत्रातील कंपनी आहे.

Marico शेअर किंमत सविस्तर :
मॅरिको लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी दिवसा अखेर प्रति शेअर 524.60 रुपये वर बंद झाले होते. 6 जुलै 2001 रोजी ह्या स्टॉकची किंमत 2.81 रुपये होती. म्हणजेच, सुमारे 21 वर्षांपूर्वी हा स्टॉक 2.81 रुपये वर होता ज्याने आता आपल्या गुंतवणूकदारांना 18,569.04 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.आपण एक उदाहरणावरून समजून घेऊ, जर तुम्ही या स्टॉकमध्ये 21 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची गुंतवणूक 1.86 कोटी रुपये झाली असती. मागील पाच वर्षांत स्टॉकमध्ये 63.96 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. परंतु हा स्टॉक मागील वर्षी फक्त 0.77 टक्के वाढला होता. दर वार्षिक वाढ या आधारावर, 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 2.04 टक्के वाढला आहे. आणि मागील सहा महिन्यांत स्टॉक मध्ये 3.36 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 1 महिन्यात स्टॉक 3.34 टक्के आणि गेल्या 5 दिवसात 0.18 टक्के वाढला आहे.

18 ऑक्टो 2021 रोजी स्टॉकने 607.70 रुपयांच्या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांकावर मजल मारली होती. तर NSE वर 27 जानेवारी 2022 रोजी स्टॉक 455.65 रुपयाच्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकीवरून 15.13 टक्के वरती म्हणजेच, सध्याच्या बाजारभावानुसार हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीपेक्षा 13.67 टक्के खाली ट्रेडिंग करत आहे. त्याच वेळी, स्टॉक सध्या त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकी पातळी वरून 15.13 टक्के वर व्यवहार करत आहे.

कंपनीबद्दल सविस्तर :
मॅरिको लिमिटेड ही एक FMCG कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 67,645.93 कोटी रुपये आहे. ही एक लार्ज कॅप म्हणजेच मोठे बाजार भांडवल असलेली कंपनी आहे. मॅरिको कंपनी ही भारतातील ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रमुख उत्पादकांपैकी आणि वितरकापैकी एक आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रँड्स आहेत. यामध्ये पॅराशूट, सॅफोला, सॅफोला फिटिफाय गॉरमेट, सफोला इम्युनिवेडा, सफोला मीलमेकर, हेअर अँड केअर, पॅराशूट अॅडव्हान्स्ड, निहार नॅचरल्स, मेडिकेअर, कोको सोल, रिव्हाइव्ह, सेट वेट, लिव्हॉन आणि बिअरडो आणि जस्ट हर्ब्स अश्या मोठ्या ब्रँड्स चा समावेश आहे. मॅरिकोला बिझनेसवर्ल्ड आणि SUSTAIN LABS PARIS कडून A+ रेटिंग प्राप्त झाली आहे. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Penny Stocks Marico limited share price return on 10 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या