23 November 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IPO Investment | हा आयपीओ लाँच होण्याआधीच स्टॉक ग्रे-मार्केटमध्ये 30 रुपयांच्या प्रीमियमवर, IPO लॉन्चिंगवेळी धमाका होऊ शकतो

IPO investment

IPO Investment | शेअर बाजारातील तज्ञ आणि निरीक्षकांचे म्हणणे आहे की मंगळवारी सिरमा एसजीएस कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 30 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. सोमवारी ग्रे मार्केटमध्ये सिरमा कंपनीचे शेअर्स 27 रुपयांच्या प्रीमियमवर पोहोचले होते.

नवीन IPO च्या आणि नुकसानीचा दुष्काळ हटविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक धमाकेदार बातमी आली आहे. 80 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेअर बाजारात नवीन IPO येत आहे. हा IPO आहे चेन्नईस्थित अभियांत्रिकी आणि डिझाइन कंपनी सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा. या कंपनीचा IPO 12 ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना सबस्क्रिप्शनसाठी खुला केला जाईल. आणि शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 पर्यंत IPO टाकण्यासाठी खुला असेल. आयपीओ येण्याच्या आधी ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक जबरदस्त धमाका करत आहे. सिरमा एसजीएसचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये तब्बल 30 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 27 रुपये प्रीमियमवर :
शेअर बाजार तज्ञ आणि निरीक्षकांचे ह्या स्टॉक बद्दल म्हणणे आहे की मंगळवारी सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये 30 रुपयांच्या प्रीमियम वर पोहोचला होता. IPO येण्याच्या आधीच ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएस चा स्टॉक 27 रुपयांच्या प्रीमियमवर किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच सोमवारच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स आता तीन रुपये अधिक प्रीमियमवर पोहोचले आहेत. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची सुरवातीची किंमत 209 ते 220 रुपयेच्या दरम्यान असेल. ग्रे मार्केटमध्ये 30 रुपयांच्या प्रीमियम किमतीचा अर्थ असा आहे की जर कंपनीचे शेअर्स वरच्या किंमतीच्या पातळीवर वाटप केले गेले तर स्टॉक 250 रुपयांच्या जवळपास सूचीबद्ध होऊ शकतो.

सिरमा एसजीएस आयपीओ सविस्तर :
सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीजच्या IPO ऑफरमध्ये 766 कोटी रुपयांच्या नवीन शेअर इश्यूची ऑफर देण्यात आली आहे. आणि सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 3,369,360 इक्विटी शेअर्सच्या विक्रीची शक्यता आहे. Syrma SGS (सिरमा एसजीएस) च्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा महसूल 43 टक्के वाढून 1267 कोटी रुपये पर्यंत गेला आहे. त्याच वेळी, कंपनीचा वार्षिक नफा तब्बल 17 टक्के वाढून 76.46 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्सच्या आकडेवारीनुसार नुसार, कंपनीमध्ये संचालकांच्या गुंतवणुक आणि हिस्सेदारीचा वाटा 61.47 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO investment Syrma SGS technology share price return on 10 August 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x