24 November 2024 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती

Mutual Funds

Mutual Funds | गुंतवणूक बाजारात इक्विटी फंड चांगला परतावा देण्यात सर्वोत्तम मानले जातात. परंतु यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर जास्त फायदा होतो. या म्युचुअल फंडात दीर्घ कालावधीत जबरदस्त पैसे कमविण्याची क्षमता आहे. हे म्युचुअल फंड आपल्या पोर्टफोलिओपैकी किमान 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये करतात. भांडवल निर्माण करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारातील अनिश्चितता, अस्थिरता आणि जोखीम लक्षात घेता, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातून चांगला परतावा मिळविण्यासाठी किमान पाच वर्षे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहावी. इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करताना जोखीम, कालमर्यादा आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे यांची तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने मागील 3 वर्षात फार कमी गुंतवणुकीत जबरदस्त परतावा दिला आहे.

पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड :
ह्या फंड ची सुरुवात डिसेंबर 2013 मध्ये झाली होती. व्हॅल्यू रिसर्च डेटानुसार या म्युचुअल फंडाला 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. 30 जून 2022 रोजी PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाची अॅसेट अंडर मॅनेजमेंट प्रमाण 5168.64 कोटी रुपये एवढे आहे. आणि 2 ऑगस्ट 2022 रोजी या फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य 48.28 कोटी रुपये होते. फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.45 टक्के आहे. हे त्याच्या श्रेणीतील इतर सर्व फंडांच्या तुलनेत कमी आहे.

परतावा कामगिरी :
स्थापनेपासून ते आतापर्यंत, PGIM India Midcap Opportunities Fund Direct-Plan ने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 19.91 टक्के आणि 10.96 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तीन वर्षांपूर्वी या फंड ने मासिक SIP योजना सुरू केले होती, त्यात मासिक एसआयपी 10,000 रुपये या हिशोबाने दररोज फक्त 333 रुपये गुंतवणूक केली असती तर तीन वर्षांत 41.76 टक्के परतावा मिळाला असता. आणि परतावा रक्कम तब्बल 6.24 लाख रुपये झाली असती. जर तुम्ही 10,000 रुपयांची मासिक SIP 5 वर्षांपूर्वी सुरू केली असती, तर गुंतवणुकीची रक्कम 12.21 लाख रुपये झाली असती. हा परतावा मागील 5 वर्षांत फंडाच्या 19.92 टक्के एवढ्या वार्षिक परताव्यावर आधारित आहे. मागील सात वर्षांत फंडाच्या 16.42 टक्के वार्षिक परताव्याच्या आधारावर, 10,000 रुपयांची मासिक SIP आता वाढून 19.29 लाख रुपये झाली असती.

फंडाचा पोर्टफोलिओ :
या फंडाने आर्थिक क्षेत्र, भांडवली वस्तू बाजार, वाहतुक क्षेत्र, आरोग्यसेवा सुविधा, आणि साहित्य उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड, एबीबी लिमिटेड, टिमकेन इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या म्युचुअल फंडाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या 5 होल्डिंग्स पैकी आहेत. हा म्युचुअल फंड त्याच्या एकूण मालमत्तेपैकी 91.44 टक्के फंड देशांतर्गत इक्विटीमध्ये गुंतवतो त्यापैकी 11.02 टक्के लार्ज-कॅपमध्ये, 61.64 टक्के मिड-कॅप, आणि 19.28 टक्के स्मॉल-कॅपमध्ये गुंतवले आहेत.

आणखी एक जबरदस्त म्युचुअल फंड म्हणजे क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा देखील एक भरघोस परतावा देणारा फंड आहे. क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड डायरेक्ट-ग्रोथने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 21.95 टक्के परतावा मिळवून दिला आहे. स्थापनेपासून, यानl फंड ने सरासरी 16.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या फंडाने 38.00 टक्के वार्षिक परताव्यासह, मासिक 10,000 रुपये एसआयपी गुंतवणुकीचे आता सुमारे 6.78 लाख रुपये केले आहे. 5 वर्षांपूर्वी सुरू केलेली 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक आता 12.73 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds investments for long term to earn huge return on 11 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x