24 November 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन
x

केवळ बिहार नव्हे | संपूर्ण उत्तर भारतात भाजपला धक्का देण्याची जोरदार फिल्डिंग, या आकडेवारीने भाजपाची धास्ती वाढली

Lokbsabha Election 2022

Loksabha Election २०२४ | राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपली सदस्यसंख्या वाढवून १,०५,९७,०९९ इतकी केली आहे. यामध्ये एकट्या बिहारमधून त्यांच्या सदस्यांची संख्या ९८ लाख ६४ हजार २०३ इतकी आहे. याशिवाय झारखंड आणि इतर राज्यांमध्ये त्याचे ७ लाख ३२ हजार ८०६ सदस्य आहेत. तर जदयूचे 37 लाख सदस्य आहेत. त्यामुळे उत्तर भारतात आतापासूनच भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करण्यासाठी मोठे पक्ष थेट जमिनीवर कामाला लागले आहेत.

एक कोटी सदस्य असण्याचे उद्दिष्ट, पण त्याहून अधिक पल्ला :
पक्षाने एक कोटी सदस्य असण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय मुख्य निवडणूक अधिकारी उदय नारायण चौधरी यांच्या मान्यतेनंतर गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाच्या संघटनात्मक वर्ष 2022-2025 साठी राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार नूतनीकृत व प्रथमच सभासद मिळून एकूण १,०५,९७,००९ सभासद आहेत. हे पक्षाच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा सुमारे 6 लाख अधिक आहे.

संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू :
ही यादी प्रसिद्ध होताच राष्ट्रीय जनता दलात संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी संबंधित युनिटमध्ये निवडणूक अधिकारी नियुक्त करतील. त्यानंतर ते राष्ट्रीय कार्यकारिणीने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेतील. १६ ऑगस्टपूर्वी सर्व ५३४ ब्लॉक्स, ३३२० वॉर्ड आणि ८४६३ पंचायतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाईल. बूथ कमिटी, पंचायत युनिट, ब्लॉक युनिट आणि जिल्हा युनिटच्या निवडणुका १६ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पूर्ण होतील. राज्य युनिटच्या निवडणुकीची प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सर्व राज्यांमध्ये सुरू होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी सर्व राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये जेडीयूला राज्यातील मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जाही मिळाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. मणिपूरमध्ये २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता निवडणूक आयोगाने जेडीयूला हा दर्जा दिला आहे.

बिहार आणि अरुणाचल प्रदेशात जेडीयू :
बिहार आणि अरुणाचल प्रदेशात जेडीयूला नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा आधीच मिळाला आहे, असेही आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. याचे निवडणूक चिन्ह बाण आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ मधील तरतुदींच्या पार्श्वभूमीवर जदयूला आयोगाने हा दर्जा दिला आहे. अशात जादुय आता तीन राज्यांत मान्यताप्राप्त पक्ष बनला आहे.

मणिपूरमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीत जदयूने सहा जागा :
विशेष म्हणजे चार राज्यांमध्ये मान्यताप्राप्त पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो, अशी माहिती आहे. मणिपूरमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीत जदयूने सहा जागा जिंकल्या होत्या. जदयूला एकूण १०.६९ टक्के मते मिळाली. त्यात ३६ उमेदवार रिंगणात होते.

फक्त बिहार’मध्येच लोकसभेच्या 40 जगाचं लक्ष :
2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवण्यात येणार आहे, असं ललन सिंह यांनी सांगितलं. येत्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयू मिळून निवडणुका लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ललन सिंह हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. लालू प्रसाद यांनी भाजपला 40 जागांवर पराभूत करण्याचं टार्गेट ठेवा असं सांगितलं. बिहारबरोबरच बंगाल आणि झारखंडमध्येही भाजपला पराभूत करायचं आहे, यावरही आम्ही भर देणार आहोत, असं ललन सिंह यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lokbsabha Election 2022 RJD JDU alliance making challenge for BJP check details 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Lokbsabha Election 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x