25 November 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620
x

राज्यातील मतदारांच्या मनातील सुप्त लाव्हा भाजप-शिंदेंच्या मुळावर, सर्व्हेनुसार लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसणार

Mood of The Nation

Mood of The Nation | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत असलेली उभी फूट समोर आली. या सगळ्या स्थितीबाबत तसंच बिहारमध्ये जे सत्तानाट्य घडलं त्याबाबत इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये लोकांनी आज घडीला लोकसभा निवडणूक झाली तर महाराष्ट्रात काय चित्र असेल याचं उत्तर दिलं आहे.

लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३० जागा युपीएला मिळतील :
आज लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यापैकी ३० जागा युपीएला मिळतील म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळतील. असं इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेमध्ये लोकांचं म्हणणं आहे. तसंच १८ जागा या एनडीएला म्हणजेच भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळतील असं लोकांना वाटतं आहे. असं घडलं तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक आहे यात शंकाच नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड प्रभाव २०१४ मध्ये दिसून आला होता. तसंच २०१९ मध्येही तो कायम राहिला. एनडीएचे जास्त खासदार या दोन्ही वर्षांमध्ये निवडून आले. मात्र आत्ता जे सत्तानाट्य महाराष्ट्रात घडलं आहे त्यानंतर जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर हे चित्र भाजपसाठी धक्कादायक ठरेल असं लोकांचं म्हणणं आहे. तसेच प्रचंड महागाई आणि बेरोजगारीवरून मतदारांच्या मनात मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप देखील आहे.

शिंदे गटाला आणि भाजपला मोठा धक्का बसणार :
एकंदरीत सर्व्हेचा फटका बसेल तर तो शिंदे गटाला आणि भाजपला आहे. हा अत्यंत धक्कादायक सर्व्हे आहे असंच समोर येतं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले आहेत. त्याच काळात घेतलेला हा सर्व्हे आहे. भाजप आणि शिवसेना यांच्याकडे ४२ जागा होत्या. आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागांचं बळ आहे. मात्र याचं नुकसान होऊन त्या १८ वर येऊ शकतं असं लोकांना वाटतं आहे. त्यामुळे आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mood of The Nation check details on Maharashtra 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Mood of The Nation(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x