26 November 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 573% परतावा दिला - NSE: IRB Horoscope Today | आज या 5 राशींचे नशीब फळफळणार; काहींना मिळणार प्रमोशन तर, काहींना व्यवसायात वृद्धी, पहा तुमची रास कोणती Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News
x

Post Office Investment | जबरदस्त योजना, या गुंतवणुकीत 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल आणि अल्प व्याजावर कर्जाची सुविधाही मिळेल

Post Office Investment

Post Office Investment | पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही भारतातील पगारदार लोकांसाठी सर्वाधिक पसंतीच्या गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. खरं तर, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी चांगल्या परताव्यासह अनेक योजना जाहीर करत असतात. जोखीम नसलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफीस योजना अधिक योग्य आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक गुंतवणूक योजना आणि जबरदस्त परतावा मिळेल. त्यातीलच एक पर्याय म्हणजे मुदत ठेव किंवा पोस्ट बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करणे. तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट चा देखील उत्तम गुंतवणूक पर्याय दिला जातो. या योजनेत तुम्ही लहान गुंतवणूक जरी केली तर कमीत कमी 16 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.

कोण गुंतवणूक करू शकतो ?
पोस्ट ऑफिस आरडी योजना हा गुंतवणुकीच्या सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक मानला जातो. आणि या योजनेत तुम्हाला जबरदस्त प्रमाणात परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही बालक किंवा मुलाद्वारे सुरू केले जाऊ शकते. इंडिया पोस्ट ऑफिस च्या वेबसाइटनुसार, या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 100 रुपये आहे. दुसरीकडे, तुम्ही किमान मर्यादेपेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करण्यासाठी दरमहा 10 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता.

योजनेतील परतावा :
पोस्ट ऑफिस रिकरिंग गुंतवणूक योजनेत तुम्हाला जुलै 2022 पासून वार्षिक 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. हा व्याज परतावा दर तिमाही आधारावर सरकार द्वारे बदलू शकतो. केंद्र सरकार सर्व लहान बचत योजनांसाठी दर तिमाहीत नवीन व्याजदर जाहीर करत असते. हे परतावा व्याजदर वाढवणे किंवा कमी करणे सरकारच्या अधिकारात आहे. मागील अनेक तिमाहींपासून दरांमध्ये कोणताही बदल केला गेला नाही.

मुदत पूर्ती कालावधी काय आहे?
पोस्ट ऑफिस RD खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी किंवा 60 महिन्यांनंतर त्याची होतात. परंतु तुम्ही पोस्ट ऑफिसमधील आरडी खाते तीन वर्षांनंतर बंद करू शकता. एवढेच नाही तर खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर तुम्ही 50 टक्क्यांपर्यंत कर्जही घेऊ शकता. मुदतीपूर्वी खाते बंद झाल्यास, मुदतपूर्तीच्या एक दिवस आधी, पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजदर लागू होतील. पोस्ट ऑफिस आरडी खाते मॅच्युरिटीनंतरही 5 वर्षांपर्यंत वाढवता येतात.

धोका आणि जोखीम नाही :
या योजनेत तुमचे व्याज आणि पैसे दोन्ही सुरक्षित असतात. लक्षात घ्या की या योजनेत चांगला परतावा मिळवताना संभाव्य जोखीम नगण्य आहे, कारण ही सरकारी योजना आहे. जर एखादी व्यक्ती अशा पर्यायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल ज्यामुळे तुम्हाला नियमितपणे लहान रक्कम गुंतवता येईल आणि जास्त परतावा मिळेल, तर आरडी खाते उघडणे हा सर्वात उत्तम गुंतवणुकीचा मार्ग आहे.

तुम्हाला याप्रमाणे दीर्घ कालावधीत 16 लाख रुपये परतावा मिळेल. तुम्ही या योजनेत सध्याच्या 5.8 टक्के व्याज परतावा दराने दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास, 10 वर्षांच्या कालावधीत परतावा रक्कम सुमारे 16 लाख रुपये होईल. यापैकी, 10 वर्षांमध्ये तुमच्या एकूण ठेव रकमेवर 12 लाख मिळतील. आणि अंदाजे परतावा सुमारे 4.26 लाख रुपये मिळेल. त्यामुळे तुम्हाला एकूण 16.26 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Investment recurring account return on 12 August 2022.

हॅशटॅग्स

Post Office Investment(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x