22 November 2024 10:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली

Bihar DCM Tejashwi Yadav

DCM Tejasvi Yadav | उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. महाआघाडी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल तेजस्वी यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. मंत्रिमंडळ स्थापनेबाबतही त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीनंतर तेजस्वी यांनी माध्यमांना सांगितलं की, बिहारमधील सत्ताबदलानंतर आज घटक पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. डी. राजा, सीताराम येचुरी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. सर्वांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले. हे सरकार जोरदारपणे चालेल. हे जनतेचे सरकार आहे. बिहार विधानसभेत आता भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र आहेत, हेच दृश्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बिहारने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे असं त्यांनी म्हटले.

तेजस्वी म्हणाले होते की, ते दिल्लीतील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही भेटतील ज्यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार . तसेच इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत.

पक्ष सोडून भाजपमध्ये पळणाऱ्यांना जोरदार टोला :
तेजस्वी यादव यांनी दिल्लीत पोहोचून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपनं महाराष्ट्र , झारखंड, राज्यात प्रादेशिक पक्षाचं काय केलं बघितलं, जो घाबरेल त्याला त्याला ईडीचा धाक दाखवून घाबरवलं आणि जो खरेदी करता येईल त्याला खरेदी केलं, पण बिहारी विकला जाणारा नाही, असे म्हणत शिंदे गटालाही टोला गवाला आहे. भाजपाच्या विरोधात आम्ही बिहारमधून सुरुवात केली आहे, आता आम्ही आणि नीतीश कुमार एकत्रित आहोत, सगळ्या विरोधी पक्षांनी आता एकत्रित बसण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना केलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bihar DCM Tejashwi Yadav statement to media after meeting with Sonia Gandhi see details 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Bihar DCM Tejashwi Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x