अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार?
BJP MLA Ashish Shelar | मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसणार. या निवडणुकीच्या वेळी मुंबई महापालिकेत बदल निश्चित होणार अशी घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महापालिका ही आमची जहागीर आहे असं समजत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून आम्ही काढून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खड्ड्यांची समस्या, त्याच त्याच कंत्राटदारांना पोसणं, कोस्टल रोडचं निकृष्ट काम असे असंख्य विषय आहेत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
सांडपाणी निविदेत दिरंगाई आणि घोळ यातून शिवसेनेचे हात झटकू शकत नाही. आमचं ठरलं आहे भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायचं आहे. मुंबईकरांच्या मनात असलेलं विकासाचं चित्र रंगवून मुंबईकरांना सुपूर्द करायचं आहे असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करण्यासाठी :
मुंबईकरांसाठी आम्ही गेली दोन दशकभर ज्यांच्याबरोबर संघर्ष केला, त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय नेतृत्वाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्ही आमचाच महापौर महाापालिकेत बसवू असेही आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले.
Shivsena Yashwant Jadhav Fàmily Fraud, We had filed Complaint with Income Tax, ED… on 18 August 2021.
शिवसेना यशवंत जाधव घोटाळा. आम्ही 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर, ED कडे तक्रार दाखल केली होती. @BJP4India @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/Bm12iogh21
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 28, 2022
मुंबईकरांना या पासून सुटका हवी :
मुंबईतील रखडलेला कोस्टल रोड, मेट्रोच्या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार, शालेय साहित्य देण्यात झालेला विलंब अशी अत्यंत भ्रष्ट व्यवस्था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना या पासून सुटका हवी आहे. ज्यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पुर्ण होईल, असेही त्यांनी जाहीर केले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mumbai BJP President MLA Ashish Shelar press conference before BMC Election 2022 12 August.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार