11 December 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Box Office Report | लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधनची दुसऱ्या दिवशी कमाई, साऊथच्या सिनेमांमध्ये कोण पुढे जाणून घ्या

Box Office Report

Box Office Report | बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या वेळी दोन्ही सिनेमांमध्ये टक्कर झाली होती. एकीकडे ‘लाल सिंह चढ्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती, त्यामुळे दोन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयच्या सिनेमाची संधीही चांगली नव्हती. 12 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांच्या संघर्षादरम्यान अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनीही चित्रपटगृहात धडक दिली आहे. अशात आमीर आणि अक्षय बॉलिवूडची विश्वासार्हता वाचवू शकणार की पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे शुक्रवारी कोणत्या चित्रपटाने किती व्यवसाय केला आणि कोणावर विजय मिळवला, हे पाहूया.

लाल सिंह चढ्ढा :
आमिर खानने चार वर्षानंतर ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून पुनरागमन केले आहे. अशा परिस्थितीत सिनेमाबद्दल अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, मात्र सुरुवातीपासूनच सिनेमांना सोशल मीडियावरून लोकांचा विरोध होत आहे. पहिल्या दिवशी जिथे या सिनेमाने 12 कोटींचा गल्ला जमवला होता, तिथे दुसऱ्या दिवशी 35 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ‘लाल सिंह चढ्ढा’ने दुसऱ्या दिवशी 7.75 कोटी ते 8.25 कोटींचा व्यवसाय केला आहे.

रक्षा बंधन :
‘रक्षाबंधन’ हा अक्षय कुमारचा यावर्षीचा तिसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘बच्चन पांडे’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं दर्शन घडवणारी ‘रक्षाबंधन’ची कथा सर्वांनाच अपेक्षित होती. पण चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत २५ टक्के घट झाली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 9 कोटींचा गल्ला जमवला होता, तर दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या आकड्यांनुसार 6 ते 6.40 कोटींची कमाई झाली आहे.

वीरुमन :
एम. मुथय्या दिग्दर्शित आणि लिखित ‘वीरमान’ हा चित्रपट 12 ऑगस्टरोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्ती, आदिती शंकर आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर टूडी एंटरटेन्मेंट बॅनरखाली सूर्या आणि ज्योतिका यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुरुवातीच्या आकड्यांनुसार, पहिल्या दिवशी या सिनेमाने 5.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

नान थान केस कोडू :
रथीन बाला कृष्णन दिग्दर्शित ‘नान थान केस कोडू’ हा एक मल्याळम चित्रपट आहे. कुंचको बोबन स्टारर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाचा 1.20 कोटींचा व्यवसाय होता आणि दुसऱ्या दिवशी 1.30 कोटींची कमाई केली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार चित्रपटाची एकूण कमाई 2.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

कार्तिकेयन 2 :
चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘कार्तिकेयन 2’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, आदित्य मोहन, अनुपमा परमेश्वरन आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. ‘कार्तिकेयन २’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘कार्तिकेयन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची सुरुवातीची आकडेवारी समोर आली असून त्यानुसार 1.05 कोटींचा व्यवसाय केला आहे. अंदाजानुसार, पहिल्या दिवशी हा चित्रपट 4 कोटी रुपये जमा करू शकतो.

बिंबिसारा :
नंदमुरी कल्याण राम यांच्या ‘बिंबिसारा’ने डल्कर सलमान आणि मृणाल यांच्या चित्रपटाला सुरुवातीपासूनच मागे टाकले होते. हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने ‘सीता रामम’ पेक्षा जास्त संग्रह केला आहे. मात्र, शुक्रवारी ‘सीता रामम्’चा संग्रह ‘बिंबिसारा’पेक्षा अधिक गाजला. सुरुवातीच्या आकड्यांनुसार ‘बिंबिसारा’ने 70 लाख रुपयांची कमाई केली असून अशा परिस्थितीत चित्रपटाचे एकूण कलेक्शन वाढून 33.10 कोटी रुपये झाले आहे.

सीता रामम :
मृणाल ठाकूर आणि डल्कर सलमानचा ‘सीता रामम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. हनु राघवपुडी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ‘सीता रामम’ने शुक्रवारी १.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची एकूण कमाई वाढून 27.85 कोटी झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Box Office Report Karthikeya 2 Viruman Ravi Bopanna Laal Singh Chaddha Raksha Bandhan day 2 collection 13 August 2022.

हॅशटॅग्स

#Box Office Report(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x